।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।। २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसापासून घरोघरी कार्यक्रमाची पत्रिका, मंदिराचा फोटो, आणि अक्षदा पोहोचवल्या गेलेल्या आहेत. २२ जानेवारी रोजी घरोघरी उत्सव साजरा होत आहे . बारा वाजून वीस मिनिटांनी अयोध्याला मूर्तीची स्थापना होणार आहे. याप्रसंगी आपल्याकडे आपल्या अक्षदा रामाला वहायच्या आहे. राम नामाचा जप करायचा आहे. रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. दिवे लावायचे आहे. रोषणाई करायची आहे. पंजीरीचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवा.( पंजीरी म्हणजे, गुळ, धनेपावडर, सुंठ, खडीसाखर, खोबरे. एकत्रित पावडर.) दिवाळी साजरी करायची आहे. राम नामाचा झेंडा हाती घेतलेला प्रत्येकाने फोटो काढायचा आहे. एकूणच सर्वदूर राममय वातावरण झालेले आहे. अनेक ठिकाणी अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. काही ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून एकत्रित जप रामरक्षा स्तोत्र पठण सुरू आहे. शाळांमधून रामरक्षा स्तोत्र म्हटले जात आहे. रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व खूप मोठे आहे. त्या दृष्टीने...
छान मॅडम 👍🙏
उत्तर द्याहटवा