पश्र्चिम बंगाल मध्ये भाजपा जिंकली ! हे वाक्य चूकीचे आहे का ? याचे उत्तर खचितच नाही असे येणाऱ्या काळात दिसणार ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


पश्र्चिम बंगाल मध्ये भाजपा जिंकली !

हे वाक्य चूकीचे आहे का ?

           याचे उत्तर खचितच नाही असे म्हणावे लागेल, ममता बॅनर्जी यांनी दोनशेपार जागा जिंकून हॅटट्रिक साधली आहे ती एका अर्थाने राज्यापुरती मर्यादीत समजावी लागेल.
पश्र्चिम बंगालच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयाविषयी आज माध्यमांमधून रकानेच्या रकाने भरून येतील, तसे यायलाही हवेत याबद्दल कुणाचेही दुमत असू नये, लोकशाहीचा तो सन्मानच म्हणावा लागेल, ही नाण्याची एकच बाजू आहे, दुसऱ्या बाजूनेही विश्लेषण केल्यास केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचा काही छुपा अजेंडा असेल तर त्यासाठी तीन वरून ऐंशीच्या आसपास जागा जिंकणे व पश्र्चिम बंगाल मध्ये मोठा विरोधी पक्ष म्हणून बसणे हा वरकरणी पराभव दिसत असला तरी भाजपासाठी हाच खरा मोठा विजय आहे !



        केंद्रात तील भारतीय जनता पक्षाचे सरकारचा अजेंडा व त्यासाठी लागणारे राज्यसभेतील संख्याबळ याचा विचार केल्यास काही मर्यादा येत आहेत,

मात्र काल झालेल्या पश्चिम बंगाल मधील निवडणूक निकालानंतर भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ पाच ते सहा जागांनी वाढते आहे तद्वतच विरोधातील संख्याबळ पाच ते सहा ने कमी होते. याचाच अर्थ राज्यसभेतील हा संख्यात्मक बदल दहा ते बारा ने होतो आहे, याचा सरळसरळ भाजपाला आपला अजेंडा राबविताना सोपे होते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतल्यास पश्चिम बंगाल निवडणूकीचे विश्लेषण करताना "भाजपाचाच विजय" झाला आहे असे वाटते.
संपादक- न्यूज मसाला, नासिक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।