वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर ! कलागुरूच्या स्मृतींना दोन विश्वविक्रम अर्पण !! विश्वविक्रमच्या अमी छेडा यांच्या हस्ते संजय देवधर यांचा प्रमाणपत्रासह सन्मान !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!





वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची
मोहोर 


   कलागुरु पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतीला मी दोन विश्वविक्रम अर्पण केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वारली चित्रस्पर्धेतील सर्वाधिक सहभागाची 'वंडरबुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल'मध्ये नोंद झाली. यावेळी वारली चित्रांच्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्यात आली. त्याची दखलही 'जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली व एकाच उपक्रमात माझे दोन विश्वविक्रम साध्य झाले. नाशिकमधील आर.पी.विद्यालयात झालेल्या या सोहळ्याला लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, पंचवटी एज्युकेशन सोसायटी आणि जैन सोशल ग्रुप यांचे प्रायोजकत्व व सहकार्य लाभले. त्यामुळेच आदिवासी वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर उमटली.


    वारली चित्रशैलीद्वारे गुरुवर्य पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य 'ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धे'चे आयोजन केले. २२ ऑगस्ट २०१८ रोजी पंचवटीतील आर.पी. विद्यालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत ही स्पर्धा रंगली.सुरुवातीला साधारणपणे १ हजार स्पर्धक सहभागी होतील असे ठरविण्यात आले. प्रत्यक्षात एकूण आठ गटांमध्ये ११०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले. ११०० वर्षांच्या प्राचीन वारली कलापरंपरेला केलेले हे जणु सचित्र वंदनच होते. पाच वर्षांच्या मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागाची संधी देण्यात आली. अगदी नाशिक जिल्ह्यासह आदिवासी भागातून तसेच महाराष्ट्रातील अनेकांनी सहभाग नोंदवला. काही स्पर्धक थेट डांग आणि गुजरातमधून आले व सर्वजण विश्वविक्रमाचा भाग बनले. त्यासाठी वयोगटानुसार आठ गट केले होते. बालवाडी व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना बाह्यरेषा असणारे वारली चित्र रंगभरण करण्यास देण्यात आले. छोट्या मुलांनी आकर्षक रंग भरून मनापासून आनंद घेतला. सर्व स्पर्धकांना कागद पुरविण्यात आले. बरोबर आणलेल्या रंगसाहित्याचा वापर करून दिलेल्या वेळेत चित्र रेखाटण्यात सारे रंगून गेले. शालेय विद्यार्थ्यांचे तीन गट तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे दोन गट होते. एक गट ४१ वर्षांवरील हौशी कलारसिकांच केला. एक स्वतंत्र गट कलामहाविद्यालयात तसेच वास्तुशास्त्र व इंटेरिअर डिझाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा होता. कलाशिक्षक व व्यावसायिक चित्रकारांना स्वतंत्र गटात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे कुणावरही अन्याय न होता सर्वांना पारितोषिके मिळवण्याची समान संधी  मिळाली. मोठ्या गटातील स्पर्धकांनी  विश्वशांती, पर्यावरण रक्षण व  निसर्ग संवर्धन, रक्तदान - अवयवदान, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री - पुरुष समानता, बेटी बचाव - बेटी पढाव, स्वच्छ भारत - निरोगी भारत, हरित नाशिक - सुंदर नाशिक अशा अनेक सामाजिक विषयांचे कल्पकतेने चित्रांकन केले. त्यांची कल्पनाशक्ती आणि  कौशल्य यांचा प्रत्यय त्यातून आला.


    स्पर्धेच्या प्रारंभी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी संदेशाद्वारे उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आदिवासी विकास भवनमधील सहाय्यक आयुक्त प्रकाश आंधळे, ऍड. विनयराज तळेकर, उद्योजक दिग्विजय कापडिया, खुशालभाई पोद्दार तसेच पद्मश्री मशे यांचे नातू प्रवीण मशे या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. वारली चित्रस्पर्धेतून आदिवासी समाजाच्या प्रदीर्घ परंपरेचे, संस्कृतीचे, निरागस जीवनशैलीचे सुंदर, सचित्र दर्शन उपस्थितांना घडले. वारली चित्रशैली हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे याचा प्रत्यय स्पर्धकांनी चित्रांमधून दिला. सहभागी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सुप्त कलागुण प्रकट केले. सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रत्येक गटात १० याप्रमाणे तब्बल ८० पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. सर्व विजेत्यांना एकूण ५० हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विश्वविक्रमाच्या प्रतिनिधी व परीक्षक अमी छेडा यांच्या हस्ते मलाही प्रमाणपत्रे व मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपक्रमाचे समन्वयक सचिन शाह, राजेंद्र वानखेडे, मनीष मोदी, नरेंद्र ठक्कर, नगरसेवक अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार अशोक ढिवरे, मुक्ता बालिगा, माधुरी घमंडी, पौर्णिमा आठवले, अतुल भालेराव व सुप्रिया देवधर यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री ज्योती बुक सेलर्सचे ज्योतिराव खैरनार, सरस्वती स्टेशनर्सचे कैलास पवार, पु.ना. गाडगीळ अँड सन्सचे राहुल शेवकरी, प्रवीणा दुसाने व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

                                              -संजय देवधर
***********************************
यांनी उमटवली पारितोषिकांवर नाममुद्रा...


     शशिकांत खांडवी, प्रवीण खोटरे, मयूर शिंदे, प्रेमदा दांडेकर, महेंद्र भोये, अनुष्का कुंटे, पूजा देवे, विलास देवळे, अर्चना बोरसे, गायत्री उगलमुगले, प्रियंका कोतकर, रश्मी विसपुते, मीनाक्षी राऊत, कांचन शेळके, किरण गुंजाळ, नमिता बोरसे, तेजस्विनी राऊत, मयूर देशमुख, राहुल वाघ, श्रुती कुलकर्णी, सुनेत्रा डोंगरे, चेतना गायकवाड, डॉ. स्मिता कापडणीस, सूर्यकांत मोरे, कीर्ती मालपाठक, ममता पुरोहित, दीपक भोर, सोनाली केळकर, अनुष्का कुलकर्णी, डॉ. सीमा कुलकर्णी, सुजाता काटे, माधुरी भालेराव, यामिनी चौधरी, वैशाली काकड, ऍड.अपूर्वा भंडारे,अनिल डगळे, अनुराधा गवळी.दर्शना कुलकर्णी, अदिती पळसुले, वसुधा सुर्वे, सचिन विश्वकर्मा, श्रेया जाजू, राजू अन्सारी, ऋतुजा कदम, हर्षा रामोळे, तन्वी पुरोहित, निरंजन नाठे, कोमल सरोदे, शुभम भावसार, श्रेया भावे, रसिका सोनवणे, अनिशा तातेड, अनुराग खंडारे, सिमरन संधू, प्रांजल रते, धन्वी पटेल, क्षितिजा अहिरे, अभिज्ञ देवकर, श्रेया पेखळे, श्रुती अग्रहरी, हितेश वाघेला, ओमकार जगताप, सृष्टी चिंचोले, प्रांजली भोये, सिद्धी सांगळे, तनुजा धनोकर, विनया चौधरी, स्वरा निकम, सिद्धिका पांडे, प्रगती जगताप, नंदिनी खळदकर, हर्षदा जगताप, प्रिया कोकाटे, अनन्या घुगे, मनन पटेल, वेदांत गडाख, सृष्टी गाडेकर, विभूती मोराडे, समर्थ अफ्रे, जानकी पटेल यांनी विविध गटात सर्वोत्तम चित्रे रेखाटून पारितोषिके मिळवली व आपली नाममुद्रा उमटवली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल