१ मे १९२३ ला पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. लेखक अंकुश शिंगाडे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
आज १ मे जागतिक कामगार दिन. देशात नाही तर जगात मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. महाराष्ट्रात तर याचा संबंध महाराष्ट्र दिनाशी जोडून १मे १९६० ला महाराष्ट्र दिवशी राज्याची निर्मीती करण्यात आली. नव्हे तर कामगार दिनाला महाराष्ट्र दिनाचं नवं नाव देवून नवीन राजकारण निर्माण करण्यात आलं.
१मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. का साजरा करण्यात येतो. त्याही पाठीमागे कारणं आहे. जागतिक दर्जाचे इग्लंड, डच, पोर्तुगीज या देशांनी उद्योगाचे महत्व लक्षात घेवून आपआपल्या देशात उद्योग उभारणी केली. याचं मुळ कारण तेथील ज्ञानाचा प्रसार व संशोधन. अठराव्या शतकात या युरोपीयन लोकांनी नवनवे शोध लावले. त्या शोधाच्या आधारानं वस्तूंचं उत्पादन जास्त झालं. शिवाय जागतिक बाजारपेठेत ह्या वस्तू विक्रमी स्वरुपात झाल्यानं तो पैसा गुंतविण्यासाठी त्यांना वेगळ्या बाजारपेठा शोधणे भाग होते. त्यातच या देशांनी आपला पैसा उद्योगाच्या रुपात पैसा दुस-या देशात गुंतवला. जे अविकसित देश होते. यात कारण होतं, पैसा जास्तीत जास्त कमावणे व उद्योगाचा प्रसार करणे. तसेच आपल्या देशाचा औद्योगिक विकास करणे. असले उद्योग धंदे अविकसित भागात उभारले जात होते. जसे अमेरीका भारत.या भारतातील कच्चा माल ते कमी दामात घेवून जात आणि पक्का माल या देशात आणुन विकत.
महत्वाचे म्हणजे या भांडवलदारांना उद्योगात जास्त फायदा झाला कारण मजुरांचे कामाचे तास. मजुरांच्या कामाचे तास ठरलेले नव्हते.ते बारा बारा तास काम करीत. बदल्यात सुट्ट्याही मिळत नव्हत्या. तसेच वेतनही अत्यल्प होते. त्यामुळे साहजिकच कामगार संतापले आणि त्यांनी क्रांती केली. तीच औद्योगिक क्रांती होय. या क्रांतीनुसार कामगारांच्याही स्वप्नाचा एक दिवस असावा. तो दिवस कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा हे ठरले. यानुसार १मे १८९१ मध्ये पहिला कामगार दिवस साजरा करण्यात आला. भारतात मात्र हा कामगार दिन १मे १९२३ ला साजरा केला गेला. या पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. तसेच हा कार्यक्रम मद्रास उच्च न्यायालयासमोर साजरा झाला होता. तसेच हा कार्यक्रम लेबर किसान पार्टी हिंदुस्तान संघटनेने साजरा केला.
कामगार दिनाच्या निमित्याने या दिवशी संपुर्ण कामगारांना सुटी असते. ते या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन करतात.
विशेषतः ज्यावेळी म्हणजे १८९१ ला कामगार दिनाची स्थापना झाली त्यावेळी या कामगार दिनाच्या दिवशी खालील गोष्टीची शपथही घेण्यात आली. चौदा वर्षे वयाखालील मुलांना कामाला ठेवू नये. कामगारांच्या कामाचे तास बारा वरुन आठ तास करावे. महिलांना कामगार म्हणून विशेष सुट असावी. रात्रपाळीतील कामगारांसाठी वेगळे नियम असावे. कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास समान काम व वेतन असावे.नव्हे तर त्याबाबतीत कायदाही करण्यात आला. त्यानुसार कर्मचारी(कामगार)वागायला लागले. कामगार युनियन तयार झाली.
आज जगात कामगार युनियन आहे. पण सक्षम असल्यासारखी वाटत नाही. कामगार दिनी ठरविण्यात आलेले सर्व नियम आज भांडवलदारांनी धाब्यावर बसवले आहेत अर्थात पाळले जात नाही. चौदा वर्षे वयाखालील बालके आजही काम करतांना दिसतात आणि दिसणार का नाही? कधीकधी त्यांची काम करण्यामागे मजबूरीही असते. जर लहाणपणी मायबाप अपघातात मरण पावलीत तर ते आपले पोट कसे भरतील? त्यामुळे साहजिकच या कामगार नियमाला मर्यादा पडतात. तसेच काही लोकं मजबुरीनं लहान मुलांना राबवितात आहेत.
आम्ही लहान मुले जेव्हा राबतांना पाहतो. तेव्हा आमच्यात दया करुणा निर्माण होते. पण त्यांच्यासाठी आम्ही का करु शकतो? एक उदाहरण देतो. यवतमाळ जिल्ह्यात एका गावी एका शेतक-याला पीक न झाल्याने त्याने आत्महत्या केली. घरी त्याच मानसिक धक्क्याने आई आजारी पडली. घरी एक लहान बहिण तीही दुध पिती होती. त्यामुळे परीवार सांभाळण्यासाठी त्या लहान मुलाला काम करावे लागेल की नाही. आम्ही त्याचा विचार न करता केवळ लहान बालकाच्या कामावर बोट ठेवतो. त्यांच्यासाठी काही करीत नाही. पण साधारण नक्की करतो. कामगारदिनाचं......पण नेर येथील कांचनताई मात्र तसे बोट ठेवत नाही.
कामगार दिवसाच्या निमित्याने महिलांसाठीही कायदे बनवले. पण खरंच आज महिला कामगार तरी सुखी आहेत काय? आज महिला कामगारांना भांडवलदाराच्या इशा-यावर नाचावं लागतं. भांडवलगारांनी जे म्हटलं ते त्यांना करावं लागतं. नव्हे तर स्वतःची इज्जतही वेशीवर टांगावी लागते. काही काही ठिकाणी तर कामाचे आठ तास ठरवून दिलेले असतांनाही कामगारांकडून बारा ते पंधरा तास काम घेतलं जातं. कामगारांनाही मजबुरीनं ते काम करावंच लागतं.
आज देशातील परीस्थिती समान काम आणि समान वेतनाची दिसत नाही. एकाच कामासाठी वेगवेगळा पगार कामगारांना आहे. त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार रोजच होत असतात. न्यायालयात कामगार कायद्याअंतर्गत कामगारांनी आंदोलन केल्यास वा न्यायालयात दाद मागतल्यास त्या कामगारांना कामावरुन काढून टाकले जाते. साक्षीदारासह न्यायाधीश, वकील यांना विकत घेवून न्यायदान पलटवलं जातं.
१८९१ मध्ये जाहीर केलेल्या नियमानुसार ८० देशांनी कामगार दिनाची सुटी कामगारांचा गौरव म्हणून जाहिर केली नव्हे तर या दिवशी उत्कृष्ट कार्य करणा-यांचा गौरव केला गेला. पण आज याच कामगार दिनी आम्ही कामगारांना सुटी न घेता कामावर जातांना पाहतो आहे. देशातील वाढत्या महागाईने आपल्या परीवाराची उपासमार होवू नये म्हणून राबतांना पाहतो आहे. तेव्हा असे वाटायला लागते की कामगार दिन या कामगारांसाठी आहे की या देशात राज करणा-या भांडवलदारांसाठी. साधा सुज्ञ सुशिक्षित वर्ग जिथे या कामगार दिनी सुटी उपभोगत नाही. तिथे सामान्यांचे काय? असेही प्रश्न मनात घिरट्या घालतांना मन कसं विचलीत होतं.हे न सांगीतलेलं बरं. तरीही आम्ही कामगार दिवस साजरा करतो. कळत न कळत महाराष्ट्रदिन समजून.......हा आमच्यासाठी भाग्योदय असला तरी इतर राज्यासाठी नाही. इतर राज्यासाठी हा कामगार दिन आजही कामगार दिनाचं राजकारणच आहे हे न सांगीतलेलं बरं.
अंकुश शिंगाडे
नागपू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा