जनकल्याण समितीतर्फे कोविड काळात रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन, घरपोच आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर्स, औषधे, टीफीन अशा विविध प्रकारच्या मदतीसाठी ३०० स्वयंसेवकांची फळी कार्यरत !! न्यूज मसाला सर्विसेस,. 7387333801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!
नाशिक ( प्रतिनिधी) - सध्याच्या परिस्थितीत रक्ततूटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे नाशिकरोड भागात नुकतेच कोविडचे प्रोटोकाॕल पाळून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यामध्ये ३८ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
तसेच "प्लाझ्मा डोनेशन" हे सिव्हिअर करोनाबाधित रुग्णांसाठी काही प्रमाणात जीवनदायी ठरु लागले आहे.त्यासाठी प्रबोधन, संकलन उपक्रम राबविण्यात येत आहे.
जनकल्याण संकूल उत्तमनगर येथील रुग्णोपयोगी साहित्यकेंद्रात रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून १५ 'आॕक्सिजन काँन्स्न्ट्रेटर्स' विकत घेतले आहेत. ते आपण करोनाबाधीत गरजूंना डिपाझिट ठेवून घेऊन विनामूल्य घरी वापरायला देणे सुरु केले आहे. नजिकच्या काळात आजून ५० आॕक्सिजन काँन्सन्ट्रेटर जनकल्याण संकूलमधे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्याची गरज असलेल्यांनी अंकूश बरशीले ९८९००६०७६२ यांच्याशी संपर्क करावा. शौनक गायधनी आणि अभिषेक पिंगळे या स्वयंसेवकांनी समविचारी स्वयंसेवकांची एक टीम 'जनकल्याण समिती - नाशिक' या नावाने व्हाट्सएप समूहाद्वारे संघटित केली आहे. त्यांच्या अथक उत्स्फूर्त प्रयत्नातून दुसऱ्या कोरोना लाटेत आतापर्यंत जवळ जवळ ६०-६५ कोरोना बाधितांना 'प्लाझ्मा डोनर' ऊपलब्ध करुन देण्यात आले.
या समूहातर्फे समाजातील जास्तीत जास्त कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पूढे येऊन 'प्लाझ्मा' डोनेशन करावे याकरिता ठिकठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी त्यासंबंधी माहिती देऊन ऊद्यूक्त केले जात आहे.
तसेच जवळ जवळ ४० जणांना घरी आॕक्सिजन काँन्सन्ट्रेटर अथवा जंबो सिलींडरची सोय करुन देण्यात आली आहे.
या व्यतिरीक्त भारत सरकारने पूरस्कृत केलेल्या लसीकरणाची मोहिम सक्षम व्हावी म्हणून रा.स्व. संघ नाशिक शहर महाविद्यालयीन प्रमूख विक्रम थोरात यांनी शहरातून साधारण ३०० जणांचा चमू तयार केला आहे.
त्यात प्रत्येक स्वयंसेवक फक्त एकच दिवस दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत काम करतो. कामाचे स्वरुप लसीकरणासाठी आलेल्या लोकांची नोंदणी करणे, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आणि लसीकरण झाल्यावर आर्धातास त्यांना निरीक्षण कक्षात विलग ठेऊन त्यांच्याशी संवाद साधणे.
दररोज असे किमान ५ ते जास्तीत जास्त १० स्वयंसेवक ह्या उपक्रमा अंतर्गत श्रीगुरुजी रुग्णालयातील लसीकरण व्यवस्थापनात सहभागी होत आहेत.याबरोबरच पहिल्या लाटेप्रमाणे लोकांना टिफीन, घरपोच औषधे देणाऱ्या स्वयंसेवकांबद्दल आणि संस्थांबद्दल माहिती संकलित करणे, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणे, वेगवेगळ्या भागात अँब्यूलन्सची माहिती देणे असे विविध पातळीवरचे प्रयत्न चालूच आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा