एन डी एस टी वार्षिक सर्वसाधारण सभा संशयाच्या भोवऱ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801

***********************************

एन डी एस टी वार्षिक सर्वसाधारण सभा संशयाच्या भोवऱ्यात !

नासिक (प्रतिनिधी)::-एन डी एस टी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि २१ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असे कार्यकारी मंडळाने जाहीर केले आहे पण त्या सभेविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने ही सभाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संस्थेचे ११ हजाराहून अधिक सभासद आहेत, ऑनलाईन सभेत यापैकी किती सभासदांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार हा प्रश्न आहे, उपविधी दुरुस्तीचा कोणता बदल करण्यात येतोय हे कुणालाच माहीत नाही,
कोणते फर्निचर निर्लेखन करण्यात येत आहे त्याचा तपशील गुलदस्त्यात आहे, दोष दुरुस्ती अहवाल सभासदांना बघायलाच मिळालेला नाही, मग त्यावर समर्थन देणे वा आक्षेप नोंदवणार कसा? सटाणा शाखेची खरेदी किंमत माहीत नाही, अवाढव्य खरेदीमुळे कर्ज मागणी अर्ज पडून आहेत, विमा हप्ता दरमाणसी किती हे कळायला मार्ग नाही. एजीएम च्या नियमानुसार सर्व सभासदांना वार्षिक अहवाल एक महिना आधी देणे कायदेशीर बंधनकारक असतांना त्याला फाटा देणे संशयास्पद आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होताना लिंकचा वापर करणे बंधनकारक आहे मात्र सर्वच सभासदांना लिंक साठी अनुकूल परिस्थिती असेलच असे नाही, सहनिबंधक यांनी कोणत्या मुद्द्यावर क्लीन चिट दिली हे विचारण्याचा अधिकार या सर्व परिस्थितीत सभासदांना मिळेल का ? इतर बँकांचे व्यवहार ऑनलाइन सुरू झाले असताना नव्याने नांदगाव शाखा सुरू करण्याचा घाट कशासाठी ? असे अनेक प्रश्न सभासदांसमोर असल्याने यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे सत्ताधारी मंडळींना आपल्या सोयीचे सर्व ठराव करून घेण्यासाठीची योग्य वेळ अशी चर्चा सभासदांमध्ये होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !