नासा यांच्या जादूची पिशवी कथासंग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न !! मनोरंजनासोबत प्रबोधन करणारे साहित्य- नागेश शेवाळकर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नासा यांचे साहित्य वाचकांचे मनोरंजनासोबत प्रबोधनही करते - नागेश सू. शेवाळकर
नासा येवतीकर यांच्या जादूची पिशवी कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
नांदेड - जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येवती येथील प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी आणि कथाकार नासा येवतीकर यांच्या जादूची पिशवी या ई कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विनोदी लेखक व जेष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर होते.
ई साहित्य प्रतिष्ठान कडून नासा येवतीकर लिखित जादूची पिशवी या ई कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. त्यांचे हे दहावे ई बुक होते तर तिसरे कथासंग्रह होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विनोदी लेखक व जेष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर हे होते तर प्रमुख उदघाटक म्हणून नांदेड येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. हनुमंत भोपाळे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सामंत, पक्षिमित्र तथा साहित्यिक सुंदरसिंग साबळे आणि उपक्रमशील शिक्षिका व लेखिका सौ. रुपाली गोजवडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या ऑनलाईन ई बुक प्रकाशन सोहळ्यास साहित्य सेवक समूहातील साहित्यिक नाशिकच्या सुनीता आवंडकर, नागपूरचे कथाकार अंकुश शिंगाडे, उस्मानाबादचे कवी हनमंत पडवळ, किनवटच्या लेखिका अर्चना गरुड, कवयित्री प्रीती दबडे, बीड येथील जेष्ठ मुख्याध्यापिका सुभद्रा खेडकर, बुलढाणाचे राजेंद्र शेळके, लेखक जीवनसिंग खासावत, लेखिका गौरी शिरसाट, नासा येवतीकर यांचे गुरू पांडुरंग अडबलवाड, भगवान गर्कल, जालनाचे साहित्यिक शिरीष देशमुख, कवी प्रतीक उकले, जेष्ठ साहित्यिक जी. एस. पाटील, मुंबईच्या लेखिका भारती सावंत, जळगावच्या लेखिका सुवर्णा सोनवणे, जालना येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर झगरे गुरुजी, हैद्राबादच्या लेखिका मीना खोंड यांची उपस्थिती होती. ई बुक प्रकाशन झाल्याबद्दल रमेश इटलोड, साईनाथ सायबलू, उदयकुमार शिल्लारे, क्रांती बुद्धेवार, साई पाटील, किरण रणवीरकर, नंदकुमार राजमल्ले, अशोक इलतेपोड, एम.डी.भोसले, आनंद यडपलवार आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याचे सुंदर असे सूत्रसंचालन लेखक नासा येवतीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी राजेश जेठेवाड बरबडेकर यांनी केले.
धन्यवाद!
उत्तर द्याहटवा