महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी पुरस्कार्थी ! श्रीमान अंबादास पाटील एक गुणवंत, प्रामाणिक व कृतीशील व्यक्तिमत्व ! शब्दांकन- जी.पी.खैरनार सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801
*******************************
श्रीमान अंबादास पाटील एक गुणवंत, प्रामाणिक व कृतीशील व्यक्तिमत्व !
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांची घोषणा केली. या पुरस्कारार्थी मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक म्हणुन कार्यरत असलेले श्री. अंबादास पाटील यांचा समावेश आहे.
श्री.अंबादास पाटील यांचे मुळ गांव हे सिन्नर तालुक्यातील देवपुर हे होय. अंबादास पाटलांचा जन्म हा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती मातीशी असलेली घट्ट नाळ व ग्रामीण भागातील कष्टकऱ्या विषयी असलेली प्रेम भावना त्यांच्या हृदयात ओतपोत भरलेली आहे.
श्रीमान अंबादास पाटील यांची कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे शालेय शिक्षण घेत असतांना आई वडिलां बरोबर शेती काम करणे हे नियतीने आलेच. सिन्नर तालुक्यातील देवपुर गावाची ओळख ही माजी आमदार व मुसळगाव औद्योगिक वसाहतीचे प्रणेते स्व. सूर्यभान (नाना) गडाख यांचे गाव म्हणुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात परिचित आहे. आदरणीय सूर्यभान गडाख यांच्या भावकीत जन्म घेतलेल्या अंबादास पाटलांनी जिल्हा परिषद शासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेचे रोजंदारी कर्मचारी म्हणुन काम केले. रोजंदारी कर्मचारी म्हणुन काम करत असतांना मिळेल ते काम तथा पडेल ते काम आदरणीय अंबादास पाटील साहेब यांनी केले, हे नमुद करतांना अंगावर शहारे येतात. शेतकरी कुटुंबात जन्म झाला असल्याने कुठलेही प्रामाणिक कष्ट करण्यास तमा न बाळगणारा हा अवलिया आपली पत्नी व मुले यांना त्यांचे मुळ गाव देवपुर येथे ठेऊन नोकरीनिमित्त जिल्हाभर फिरत होता व कुटुंबातील पत्नी व मुले यांचेकडून शेतीचे कष्ट उपसून घेत होता.
सुरुवातीला नाशिक जिल्हा परिषद सेवेत परिचर म्हणुन दाखल झाल्यानंतर थोड्याच काळात शैक्षणिक गुणवत्तेवर श्री. अंबादास पाटील यांची कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती झाली. त्यांची परिचर पदासह कनिष्ठ सहाय्यक पदाची सर्व शासकीय सेवा ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर झाली होती. सुदैवाने वरिष्ठ सहाय्यक म्हणुन पदोन्नतीने श्री. पाटील यांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुखदेव बनकर यांनी पुन्हा जिल्हा परिषद मुख्यालय अंतर्गत आरोग्य विभागात पदस्थापना दिली होती.
जिल्हा परिषद मुख्यालय स्तरावर सर्व शासकीय कामकाज संगणकीय प्रणालीद्वारे करावे लागत असे. श्रीमान अंबादास पाटील यांना तत्कालीन परिस्थितीत संगणकाची आवड नसल्यामुळे डाव्या हाताने भरभर लिहिण्याची सवय होती. परंतु थोड्याच अवधीत त्यांनी संगणकीय प्रणालीवर कामकाज करण्याची कला अवगत करुन नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत वाहन भांडाराचे काम उत्तमरित्या सांभाळत आहे हे अभिमानाने नमूद करावे लागेल.
आरोग्य विभागात वाहन भांडाराचे काम सांभाळत असतांना संगणकीय इ निविदा यासह सर्व कामे प्रामाणिकपणे पार पाडणारा अवलिया म्हणुन अंबादास पाटील यांचे नाव घ्यावे लागते.
मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड आजाराने थैमान घातलेले असतांना आरोग्य विभागावर खुप मोठा कामाचा ताण पडत होता. ग्रामीण भागात असलेली आरोग्य यंत्रणा व शासकीय रुग्ण वाहिका अद्ययावत ठेवण्याचे अवघड काम श्रीमान अंबादास पाटील यांच्याकडे होते. शासकीय काम करत असतांना शासकीय वरिष्ठ अधिकारी यांना विनवणी करुन त्यांचे बोलणे खाऊन शासनाचे काम प्रामाणिक पणे करणारा कर्मचारी म्हणुन नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासात श्री. अंबादास पाटील साहेब यांची नोंद होत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मित्र श्रीमान अंबादास पाटील यांनी शासकीय काम करत असतांना प्रामाणिक पणा ठेवलाच परंतु ज्या मातीत जन्मास आले त्या मातीचे उपकार कधीही विसरलेले नाही. स्वतः शासकीय नोकरी निमित्त बाहेरगावी फिरत असतांना त्यांच्या पत्नीनेही शेतीसाठी खुप मोठ्या प्रमाणात कष्ट केले आणि ते आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.
श्रीमान अंबादास पाटील हे व त्यांचे संपूर्ण कुटुंब आध्यात्मिक कुटुंब होय. आणि अध्यात्माची गोडी लावणारे त्यांचे गुरु म्हणजे एक औषध निर्माण अधिकारी होय. संगत गुण आणि सोबत गुण हेच व्यक्तीचे जीवन घडवत असतात. असेच प्राथमिक आरोग्य केंद्र, देवपुर तालुका सिन्नर येथे कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले स्व. श्रीमान मैंद तात्या हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होय. अजूनही अंबादास पाटील साहेब यांचा स्वर्गवासी मैंद तात्या यांचे विषयी गुरु म्हणून असलेला आदर मनात कायम आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विना संगणकीय प्रणालीवर शासकीय कामकाज करण्यास अंबादास पाटील यांचा हातखंडा होता. नव्हे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कामकाज करण्याची चांगली हातोटी असल्यामुळे एकाच तालुक्यातील तीन ते चार प्राथमिक आरोग्य केंद्राचा कनिष्ठ सहाय्यक पदाचा कार्यभार त्यांनी सहजपणे सांभाळला ही कौतुकास्पद बाब होय.
आदरणीय पाटील साहेब यांनी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी शासकीय सेवा केली तेथील कार्यालयीन प्रमुख यांच्या विश्वासास पात्र राहून त्यांनी कामकाज केले हे अभिमानाने नमूद करावे लागेल.
नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य विभागातील वाहन भांडारा संबधी नस्ती सरळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी स्वतः चर्चा करुन मार्गी लावणारा कर्मचारी म्हणुन अंबादास पाटील साहेब यांची विशेष ख्याती आहे हे अभिमानाने नमूद करावे लागेल.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या भारतीय प्रशासन सेवेतील अति उच्च अधिकारी कार्यरत असतांना या उच्च विद्या विभूषित अधिकारी यांचे मनात एक वर्ग तीनचा शासकीय कर्मचारी आपल्या प्रामाणिक शासकीय सेवेतुन विश्वासाचे घर उच्च अधिकारी यांचे मनात निर्माण करतो हीच पाटील साहेब यांचेसाठी खुप मोठी शाब्बासकी होय.
कर्मचारी संघटन, सहकार, सामाजिक संघटन व शासकीय पातळीवर स्पष्ट वक्तेपणा ठेऊन निर्मळ स्वभावाने आपले मत मांडणारा निस्वार्थी कर्मचारी म्हणुन श्री. अंबादास पाटील साहेब यांना विविध स्तरावर काम करतांना मी पाहिले आहे.
आदरणीय अंबादास पाटील साहेब यांनी समाजाचे, गोरगरीब जनतेचे हित जोपासले म्हणुनच नाशिक जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या गुणवंत कर्मचारी निवड यादीत श्री. अंबादास पाटील यांची निवड होण्यासाठी शिफारस केली. विभागीय आयुक्त कार्यालय व ग्रामविकास विभागाने श्री.अंबादास पाटील साहेब यांच्या गुणवंत कर्मचारी निवडीवर शिक्कामोर्तब केले ही बाब खूप अभिमानाची म्हणावी लागेल.
आदरणीय श्रीमान अंबादास पाटील साहेब व सौ. सुनीता अंबादास पाटील या उभयतांनी आजपर्यंतच्या त्यांच्या जीवनाच्या वाटचालीत मोठ्या प्रमाणात नोकरीत व शेतीत कष्ट करुन आपल्या पोटाला चिमटा घेऊन मोठी मुलगी सौ. वैशाली हांडोरे हिस एम.फार्म तर दुसरी मुलगी डॉ. सौ. तेजस्विनी गोरे हिस बी.ए. एम.एस. व मुलगा चिरंजीव डॉ. विजय पाटील यास बी.डी.एस. या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदाचे शिक्षणासाठी आपले आजपर्यंतची सर्व आर्थिक व कष्टाची पुंजी पिढी घडविनासाठी सार्थकी लावली हे अभिमानाने सांगावे लागेल.
श्रीमान अंबादास पाटील यांच्याकडे आजच्या घडीस आर्थिक संपत्ती किती आहे हे सांगता येणार नाही परंतु पारमार्थिक विचारांचा ठेवा व जन्मी घातलेल्या पिढीस उच्च शिक्षित केल्याची खूप मोठी संपत्ती त्यांच्याकडे आहे हे मी अभिमानाने नमूद करेल.
आदरणीय श्रीमान अंबादास पाटील साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार घोषित झाला त्याबद्दल पुनश्च त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी शासकीय सेवेस शुभेच्छा !
लेखन :- जी.पी.खैरनार, नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा