पोलिस आयुक्तांची सल्लागार समिती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
नाशिक::- येथे होणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावे यासाठी नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सल्लागार समिती गठित केली आहे. संमेलनात होणारे विविध कार्यक्रम, मिरवणुक आदिस परवानगी देणे, संमेलन सुरळीत पार पडावे यासाठी उपाय योजना करणे, वाहतूक व पार्किंग व्यवस्था इ. विषयांवर ही समिती विचार करणार आहे. या समितीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार, सार्वजनिक बांधकाम, विद्युतपुरवठा, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषधे प्रशासन यांचे प्रतिनिधी आहेत. लोकहितवादी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून विश्वास ठाकूर आणि डाॅ. वैशाली बालाजीवाले हे या समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा