नाशिककरांचे घर घेण्याचे स्वप्न होणार साकार !  गृह कर्जावरील व्याज दरात घट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नाशिककरांचे घर घेण्याचे स्वप्न होणार साकार !

 गृह कर्जावरील व्याज दरात घट !

     नाशिक (प्रतिनिधी) : कोव्हीड-१९  महासाथीने मोठ्या आणि आरामशीर  घराची गरज असल्याची जाणीव लोकांच्या मनात निर्माण करून दिली आहे.  सर्वसाधारणपणे, सर्वच जण घरातच असल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांची स्वत:चे घर असावे असे वाटत आहे.  यंदा प्रथमच  गृह कर्जावरील वार्षिक व्याज दर कमी झाल्याने नाशिक करांना स्वत:च्या घराचे स्वप्न  साकार करण्याची संधी मिळत आहे. अनेक बँका गृह कर्ज देत असताना कोटक बँकेने कमी म्हणजेच ६.७५ इतका व्याजदर आकारणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्या अनेक कुटुंबातील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.

          याबाबत कोटक महिंद्र बँकेच्या ग्राहक, व्यावसायिक आणि संपत्ती विपणन सह-अध्यक्षा एलिझाबेथ वेंकटरामन यांनी सांगितले की,  “स्वप्नातले घर स्वत:च्या मालकीचे असण्यातला अभिमान आणि आनंद हा प्रत्येकासाठी सारखाच असतो. अर्थातच, काही जणांसाठी हे स्वप्न अखेरपर्यंत स्वप्नच राहते.  मात्र, कोटक गृह कर्ज हे ६.७५ टक्के प्रती वर्ष इतक्या कमी व्याज दराने उपलब्ध असल्याने हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकणार आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये घर खरेदी करण्याची अनेक कारणे आहेत, पण ६.७५ टक्के इतके कमी व्याजदर या कारणामुळे घर घेणाऱ्यांची संख्या वाढणार अशी आशा  व्यंकटरमण यांनी व्यक्त केली. कमी व्याज दर याबाबत माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून  नाशिक शहरात मोहीम राबवित असल्याचेही वेंकटरमण यांनी सांगितले. यामुळे अन्य बँका देखिल गृहकर्जावरील व्याजदर कमी करतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !