ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!
ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध !
नासिक::- केंद्रीय मार्ग व राज्यमार्गाची अधिसूचनेच्या ड्राफ्टमध्ये ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांना गैरव्यावसायिक वाहन श्रेणीतून बाहेर करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रतन चावला यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
ट्रक्टर व ट्राॅलीला सडक परीवहन विभाग किंवा एन एच ए आय च्या नियमावलीत संशोधन करून ट्रक्टर व ट्राॅलीला व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीत आणले तर टोल संकलन केंद्रावर यापुढे ट्रक्टर व ट्राॅलीला टोल भरावा लागेल यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल तथापी राज्यात तथा देशात पुन्हा मोठे शेतकरी आंदोलन उभे राहिल. यावर समर्पक निर्णय घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे आज देण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा