श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! निवेदनात नमूद केले कारण,,,,,,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!
श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! निवेदनात नमूद केले कारण,,,,,,,
नासिक::- श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन विशेष पोलिस महानिरीक्षक यांना देण्यात आले.
श्री श्री रविशंकर यांच्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ (कार्टून फिल्म) अपलोड करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा अपमान होत आहे अशी भावना निवेदनात व्यक्त केली आहे.
निवेदनात औरंगाबाद खंडपीठातील एका प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचा कोणताही संबंध नाही असे नमूद करण्यात आले असून रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करताना जे लिखाण केले व त्याचा व्हिडिओ (कार्टून फिल्म) बनविण्यात आला यातून समस्त शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्यामुळे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड चे नासिक महानगरप्रमुख हार्दिक निगळ, यांनी दिले, निवेदनावर योगेश पोटे, हर्षल पवार, प्रसाद गोसावी, आदित्य खरात, अभय खरात, शुभम ईतबारी, विनायक गोसावी, तसेच महाराष्ट्र जनस्वराज्य सेना तर्फे समाधान भारतीय, विश्र्वास वाघ, नानासाहेब बच्छाव, अॅड. सुरेंद्र सोनवणे, संतोष दळवी, पंकज संधान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा