महीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उद्दीष्ट पूर्ण करण्याचा खेळ ! आरोग्य केंद्राला जिप सदस्या व पंस सभापती यांनी दिली मध्यरात्री भेट !! स्तनदा माता शस्त्रक्रियेच्या नावाखाली वेठीस धरण्याचा निंदनीय प्रकार !! जिल्हा आरोग्य अधिकारी फोन रिसिव्ह करायला व प्रतिक्रिया देण्यास अनुत्सुक !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!


शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांला जि.प.सदस्या
माळेकरसह सभापतींची मध्यरात्री भेट.

महीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्तनदा मातांचे आरोग्य वाऱ्यावर !

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी फोन रिसिव्ह न केल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही !

     नासिक::-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना महामारीच्या दरम्यान महीला कुटुंब नियोजन शस्रक्रिया थांबल्या होत्या. तर लॉकडाऊन शिथिल होताच तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांत  शस्रक्रिया सुरु झाल्या. परंतु शासनाने दिलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना शस्रक्रियेच्या नावाखाली वेठीस धरण्याचा प्रकार हरसुल जिल्हा परिषद सदस्या सौ. रुपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांनी दिनांक २० जानेवारीच्या रात्री एक वाजता अचानक दिलेल्या भेटीत वरील प्रकार उघडकीस आला.
        जि. प. सदस्या माळेकर व सभापती दिवे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शहानिशा करण्यासाठी दोन्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मध्यरात्री महीला कुटुंब नियोजन शस्रक्रिया झालेल्या आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यामध्ये शिरसगाव आरोग्य केंद्रात २५ बाय २५ फुटाच्या खोलीत, वार्डात कुठल्याही निर्जंतुकीकरणाची सुविधा न पार पाडताच फरशीवर अंथरून टाकून महिला रुग्णांना झोपवण्यात आले होते. प्रत्यक्षात शिरसगाव आरोग्य केंद्रास १५० महीला कुटुंब नियोजन उद्दीष्ट असतांना, टार्गेट पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी क्षमेतेपेक्षा दुप्पट शस्त्रक्रिया करून स्तनदा मातांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उजेडात आणला.
                त्र्यंबकेश्वर तालुक्यात नसबंदी शस्रक्रिया करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून सदर वैद्यकीय अधिकारी शस्रक्रिया करून गेल्यानंतर रुग्णांना चार दिवस निगराणीत ठेवण्यात येते. पण शास्राक्रियेनंतर चार दिवस मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असते. कोरोनाच्या काळात कुठलेही नियम निकष न पाळता एकाच खोलीत जमिनीवर झोपवण्यात येते. तर त्यांच्या सोबत येणाऱ्या लहान बालक व नातेवाईकांना बाहेर व्हरांड्यातच झोपावे लागते.
       यावेळी स्तनदा मातांना गरम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आढळून आली नाही. शासनाच्या नसबंदीच्या टार्गेट साठी स्तनदा मातांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर वेळीच भेट देऊन वरील प्रकार उजेडात आणला असुन कारवाईच्या मागणीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, जिप सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी  जि प सदस्या रुपांजली माळेकर, सभापती मोतीराम दिवे, विनायक माळेकर,समाधान बोडके, युवा नेते मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दुल , चंदर शेवरे, उत्तम शेवरे,वामन शेवरे,विलास शेवरे, सुभाष मौळे, उत्तम मौळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
_________________________________________

स्तनदा मातांचे थंडीच्या दिवसांत जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत बघून हरसुल गटाच्या जि प सदस्या रुपांजली माळेकर यांना मायेचा पाझर फुटून त्यांनी तत्काळ ५० गरम ब्लंकेट सह, पाणी, बिस्कीट वाटप केले.
__________________________________________

इंजी. सौ. रुपांजली माळेकर :( जि प सदस्या ).                          शिरसगाव व ठानापाडा आरोग्य केंद्रात नसबंदी करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त मातांना आणून त्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे क्षमतेइतक्याच नसबंदी करण्यात याव्यात. उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या नादात स्तनदा मातांची हेळसांड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !