अथर्व वैरागकर, अथर्व वारे यांना मानाचा जोशी स्मृती पुरस्कार जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


अथर्व वैरागकर, अथर्व वारे यांना

मानाचा जोशी स्मृती पुरस्कार जाहीर


       नाशिक ( प्रतिनिधी ):- भूपाली क्रिएटिव्हज या सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतर्फे दरवर्षी दिनरंग संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये नाशिक परिसरातील होतकरु, उदयोन्मुख युवा कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी पं. 
          गजाननबुवा जोशी पुरस्कार अथर्व ओंकार वैरागकर या युवा शास्त्रीय गायकाला तर पं. नारायणबुवा जोशी पुरस्कार युवा तबलावादक अथर्व नितीन वारे यांना काल ( दि.२३ ) जाहीर करण्यात आले. स्व. पं. दिनकर कैकिणी यांच्या स्मरणार्थ दिनरंग स्मृती महोत्सव लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी हे दोन्ही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. दोघांनाही घरुन सांगीतिक वारसा लाभला असून ते नेटाने तो पुढे नेत आहेत. भूपाली क्रिएटिव्हजचे प्रमुख संदीप आपटे यांनी अशी माहिती दिली. या संगीत महोत्सवात नाशिककर रसिकांना दमदार कलाकारांच्या कलेचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

  1. श्रीराम,
    दोन्ही युवा कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा

      हटवा
    2. अथर्व वारे ह्यांना खुप खुप शुभेच्छा ह्यापुढे हा वारसा असाच चालू ठेवा संजय येवलेकर

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !