बाबा एक महान विभूती ! ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
बाबा एक महान विभूती
ब्रह्माकुमारी संस्थेचे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त !
: जगात तेच लोक महान आणि पूज्य बनतात जे दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगतात. अशा महान विभूति चिर काळासाठी अमर होतात. या महा पुरुषांचे स्मरणतूनच अनेकांना सामर्थ्य प्राप्त होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय चे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबांचे जीवन अशाच महान विभूतींपैकी एक आहे. त्यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपले तन मन धन जीवन संपूर्ण समर्पित केले होते. बाबांना नेहमी वाटे की एक असा समाज बनवा जेथे गुन्हे पापाचार, अत्याचार, व्यभिचार, तीलमात्र नसावा.
याच मजबूत मन्सूब्याने ब्रह्माबाबा यांनी ईश्वरीय निर्णया नुसार १९३६ च्या काळात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची मुहूर्तमेढ केली. त्या काळात माता कन्यांना समाजात दुय्यम स्थान होते. अशा परिस्थितीत मूल्यनिष्ठ समाज निर्मितीच्या कार्यात त्यांनी महिलांना फक्त सहभागी करून घेतले नाही तर संस्थेची धुरा अशा महिलांच्याच हाती दिली. महिलांना ज्या काळात नरकाचे द्वार सर्पिणी अशा शब्दांनी हिणवले जात त्याच विपरीत समाजव्यवस्थेत ब्रह्माबाबांनी माता कन्यांना नवसमाज निर्मितीचा संदेश देणाऱ्या अग्र सेनानी म्हणून स्थान दिले. महिलांच्या मृदू व स्नेहमयी स्वभावाला ओळखून महिलांना शिवशक्ती स्वरूपाची प्रेरणा दिली,
एक वेळेस ब्रह्मा बाबा यांच्या एका चित्रकार मित्रांनी शेष शायी विष्णूचे चित्र भेट म्हणून दिले त्यात लक्ष्मीला विष्णूचे पाय चेपतांना दाखवले होते. हे चित्र बदलून बाबांनी लक्ष्मी व नारायण यांना समान दर्शविण्याची विनंती केली. असा हा त्यांचा महिलांविषयी चा आदर होता. वंदे मातरम या शब्दाचा खऱ्या अर्थाने व्यवहारात उपयोग करणारे ब्रह्मा बाबा होते. पुरुष प्रधान संस्कृतीत त्यांनी चालवलेली हि एक नवक्रांती होती.
ब्रह्मा बाबांच्या या अलौकिक सत्संगात सर्व जाती पंथातील लोक समाविष्ट होत. आपल्या प्रवचनात ते नेहमीच नमूद करीत की मनुष्य जातीने नाहीतर आपल्या श्रेष्ठ कर्मांनी व विचारांनी महान सिद्ध होतो. त्यांनी ब्राह्मण- देवता- वैश्य- शूद्र या समाजात प्रचलित जाति व्यवस्थे च्या मान्यतेत आमूलाग्र बदल घडून आणला. ब्रह्मा बाबा आपल्या प्रवचनात नेहमी सांगत कि ज्यांचे संकल्प (विचार) कर्म हे विकारी असतील, मानवाच्या कल्याणासाठी असतील, तसेच महिलांचा अनादर करणारी असतील ते सर्व मग उच्च कुळातील असोत सर्व शुद्र आहेत. ज्यांचे विचार (संकल्प) वा कर्म हे मात्र आपला फायदा बघणारे असतील जो जीवनात फक्त पोट भरणे या उद्देशाने जीवन जगत असेल किंवा ज्यांचे जीवनात अध्यात्माला काही स्थान दिले नसेल अशी सर्वजण वैश्य आहेत. ज्यांचे संकल्प (विचार) कर्म हे नेहमीच द्वंद करणारे असतील अर्थात चांगले कर्म व विचार करता करता ज्यांच्यात वाईट विचारांचे वादळ निर्माण होत असेल तसेच आध्यात्मिक जीवन जगताना ज्यांच्यात कर्मात विकार निर्माण होत असतील तर ते सर्व युद्ध करणारे क्षत्रिय आहेत. ज्यांचे संकल्प (विचार) वा कर्म हे श्रेष्ठ, सदाचारी, दैवी गुणांनी युक्त असतील असे सर्वजण मग ते कोणत्याही जाती पंथातील असोत ते ब्राह्मण सो देवता या वर्गवारीत आहे.
ब्रह्माबाबा आपल्या प्रवचनात साधकांना सांगत की समाजात ज्या समस्या निर्माण होत आहेत त्याचे मूळ कारण आपल्यातील पाच विकार व देह अहंकार हे आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंतर्मनास प्रबळ करून ईश्वराचा संग केला तर विश्वाचे नवनिर्माण कठीण नाही. त्यांनी यातूनच स्व परिवर्तनातून विश्व परिवर्तन हा महान संदेश दिला. बाबांचे व्यक्तित्व विशाल होते. त्यांच्या सान्निध्यात येणारे प्रत्येक जण गुणांच्या प्रकाशाने प्रकाशित होत असत.
ब्रह्माबाबा यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे सुरुवात १९३६ च्या काळात सिंध हैद्राबाद येथे केली. या संस्थेचे पूर्वाश्रमीचे नाम ओम मांडली असे होते. या सत्संगात त्या काळी ३५० साधक नियमित ध्यान साधनेसाठी येत. चांगल्या कार्याला विरोधक असतातच येणे प्रमाणे ओम मांडली ला सुद्धा समाजातील रूढीवादि लोकांचा सामना करावा लागला. यातही प्रेम व क्षमाभाव ची शिकवण देणारे ब्रह्मा बाबा यांनी विरोधकांविषयी कधी द्वेष निर्माण केला नाही. बऱ्याच वेळेस बाबांवर प्राणघातक हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, परंतु जाको राखे साईयां मार सके न कोई या प्रमाणे बाबा प्रत्येक संकटातून सही सलामत सुटले. यातून अनेकांनी हल्लेखोरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले परंतु बाप कधी आपल्या मुला विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करतो का? असे सांगून बाबा नेहमी हल्लेखोरंवर सुद्धा मेहेर दृष्टी ठेवत.
अशा या महान विभूतींनी १८ जानेवारी १९६९ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. संस्थेच्या वरिष्ठ सदस्यांचा अनुभव आहे की बाबांच्या देहावसान नंतर साधारण ७० च्या दशकात मोठ्या प्रमाणात साधक संस्थेत समर्पित झाले, यावरून समजते की ब्रह्माबाबा आपले कार्य आजही दिव्य प्रेरणेतून करीत आहेत. आजही मानवजातीला आव्हान करीत आहेत की आपल्यातील काम क्रोध लोभ मोह अहंकार आदि विकारांना त्यागून ईश्वरीय कार्यात आपले तन मन धन अर्पून पुण्याचे भागीदार बना. अखिल मानव जातीचे उत्थानासाठी अविरत कार्य करणाऱ्या या महान विभूतीस त्यांचा स्मृती दिवसानिमित्त अनंत प्रणाम……….. ओम शांति
ब्रह्माकुमारीज् नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा