विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करत लाभार्थ्यांशी साधला संवाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांची कळवण तालुक्यास भेट
विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करत लाभार्थ्यांशी साधला संवाद
कळवण - नासिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी आज (१२) रोजी कळवण तालुक्यास भेट दिली. यामध्ये विविध शासकीय योजनांचा आढावा घेत लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन कामाचा दर्जा गुणवत्ता आणि सदरील योजनांचा लाभार्थ्यांना झालेला फायदा याबद्दल माहिती घेतली. कृषी विशेष घटक योजना लाभधारक अण्णा हिरामण शिंदे यांना २०१९ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहीर बांधून देण्यात आली होती, या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी २ एकर कांदा लागवड केली असुन त्यांच्या एकुण उत्पन्नात वाढ झाली असल्याचे यावेळी उपस्थित अधिका-यांना सांगितले. बायोगैस संयत्राचे लाभार्थी मिलिंद कारभारी वाघ यांच्या घरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी भेट देत माझी वसुंधरा योजनेची माहिती देऊन बायोगैस संयत्राचा वापर करणा-या वाघ कुटुंबीयांचे कौतुक केले. कळवण पंचायत समिती कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांना मिळवून देत केलेल्या कामाबद्दल शिंदे यांनी गट विकास अधिकारी डी.एम. बहिरम अतिरिक्त गट विकास अधिकारी जाधव, कृषी विस्तार अधिकारी दिलीप वाघ यांचे कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा