मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ 
कदम !
अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी  राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार.

       नाशिक ::-मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी .केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल असे
मातंग समाजाच्या विविध प्रकारच्या प्रश्नांच्या बाबत शासन   सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत बोलतांना डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.
     राज्यातील हा समाज आर्थिक ,सामजिक दृष्टीने मागासलेला असून तो  गावखेड्यात राहतो.  त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या लक्षात घेऊन शासन स्तरावरुन सकारात्मक दृष्टिकोनातून मार्ग काढण्यात येईल असेही यावेळी डॉ. कदम म्हणाले.
तसेच  क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्याबरोबरच अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती निर्गमीत करणे. तसेच वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेले वाटेगाव येथील स्मारकाच्या विकासावर भर देण्यात येईल, आदी प्रमुख मुद्यावर या वेळी चर्चा करण्यात आली. 
  या वेळी सामाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातीला प्रलंबित विविध विषयांवर चर्चा करण्यात केली बैठकीत  ,अ.को.अहिरे, व्यवस्थापकीय संचालक, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, सिध्दार्थ झाल्टे, अवर सचिव, सामाजिक न्याय विभाग, ,देवराम मेश्राम, समाजकल्याण निरीक्षक, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे, मेघराज काते, सहाय्यक प्राध्यापक, बार्टी, पुणे  आदी सह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याच बरोबर मातंग समाजाचे प्रतिनिधी म्हणून विजय अंभोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी- अनुसूचित जाती जमाती, सुरेश पाटोळे, माजी प्रदेश सचिव महा,प्रदेश काँग्रेस कमिटी,मनोज कांबळे, प्रदेशाध्यक्ष, एन. एस. यू. आय,ज्ञानेश्वर काळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा अनुसुचित जाती-जमाती आदी सामाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे