सांभळ, तूरथाळी वाद्यांच्या गजरात विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा ! आमदार नितीन पवार यांच्या हस्ते संपन्न !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


ग्रामपंचायत मांधा येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन संपन्न

भागवत गायकवाड यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस

    नासिक(२७)::-आज सुरगाणा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत मांधा व नाईकपाडा गावातील विविध कामांचा रू १ कोटी रकमेचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते आदिवासी परंपरेनुसार सांभळ, तूर थाळी अशा वाद्यांच्या स्वरूपात मोठ्या आनंदाने हा भूमिपूजन सोहळा पार पडला, मांधा गावातील परिस्थिती लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांनी तेथील जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात, ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून मांधा व नाईकपाडा येथे विविध विकास कामे व्हावे म्हणून आज हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यांनतर  माकपमध्ये कार्यरत असलेल्या जाणू पांडुरंग ठाकरे, अशोक थोरात, सुकर मळू गावित, , आदी कार्यकर्त्यांनी माकपाला सोड चिठ्ठी देत आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, चिंतामन गावित, वसंत झिरवाळ, नवसु गायकवाड, भास्कर अलबाड, यशोधन देशमुख, बाळू राऊत,आदींसह ग्रामपंचायत मांधा परिसरातील  बहुसंख्यने जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे