जल है तो कल है ! डोल्हारे येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे निर्मिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
डोल्हारे येथे श्रमदानातून वनराई बंधारे निर्मिती
भागवत गायकवाड यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
सुरगाणा ता:२६::- तालुक्यातील आदिवासी भागातील निसर्गाचं वरदान लाभलेल्या डोल्हारे ता.सुरगाणा येथे गावातील जेष्ठ माणसं, जागरूक युवावर्ग, महिला भगिनी, कृषी विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी व शाळा कर्मचारी यांच्या श्रमदानातून "जल है, तो कल है!" या उद्देशाने प्रेरित होऊन गावात लोक सहभागाने श्रम दानातून गावातील विहरीजवळ व शिवारात एका ठिकाणी असे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले.
सदर बंधाऱ्यांमुळे गाव पाणवठ्याच्या विहीरीची पाणी पातळी वाढेल. गुरांसाठी पिण्याचे पाणी राहील. कपडे धुणे व घर कामासाठी पाणी टिकून राहणार आहे.
यावेळी गावाच्या हिताच्या कार्यात कृषी सहायक हरिभाऊ गावित, ग्रामसेवक प्रविण भोये ग्रामसेवक, राजु पाडवी, वसंत पाडवी, बाळू पाडवी, लक्ष्मण वळवी, हेमंत पाडवी नारायण पाडवी, रामदास पवार, मनु पाडवी यांनी प्रत्यक्ष श्रमदानाने परिपूर्ण नियोजन करत सहभाग घेतला. नियोजना साठी कृषीपर्यवेक्षक एम.वाय. चव्हाण, सुरगाणा मंडळ कृषी अधिकारी जे.एच.आढळ, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, परशराम पाडवी सर व डोल्हारे गावातील जेष्ठांचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा