न्यूज मसाला अंक २४ डिसेंबर २०२०,. संपादकीय-- बाळासाहेबांची घरवापसी ! निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो. "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही.... भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट" बाळासाहेब सानप ! कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला,,,,,,,,,,,. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!
बाळासाहेबांची घरवापसी !
निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो. "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....
भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट" बाळासाहेब सानप !
कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला तो डोळे विस्फारणा ठरला होता, संधीच्या शोधातले बाळासाहेब नासिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, त्याक्षणी महापौर पदाची माळ गळ्यात पडते, माळेतील फुलं कोमजण्याआधीच आमदार होतात, भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष पदही एक व्यक्ती एक पद याला फाटा देत सांभाळतात ! हा बदल त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला, अती महत्त्वाकांक्षी होण्यास कारणीभूत ठरला, मंत्रीपदाचा मुकुट चढायलाच हवा अशी कार्यकर्त्यांची, नासिककरांची इच्छा होती की नाही याची चाचपणी करण्यात गल्लत झाली, राजकारणात अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी अतोनात ताकद लागते, प्रसंगी आक्रमक फळी निर्माण करावी लागते पण बाळासाहेब यांना आमदार होईपर्यंत तरी आक्रमकता दाखविण्याची वेळ आली नाही, सर्व मानसन्मान त्यांना मिळत गेला. मंत्रीपदाच्या अपेक्षेने मन बेचैन होणे अपेक्षितच आहे मात्र इतकं काही सहज मिळत असताना संयमाचा बांध फुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली तिची परीणीती पक्षाकडून पुन्हा आमदारकीचे तिकीट नाकारण्यात झाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्यात व पुढील रणनीती ठरवताना ज्यांची खरी गरज होती किंवा सल्ला देणारे होते ते काहीसे बाजूला ठेवण्याची चूक बाळासाहेबांनी केली अशी चर्चा भाजपाकडून तिकीट नाकारले होते तेव्हा होत होती ती निकालानंतर सार्थ शंका ठरली,
हा "बदल" .
एकेकाळी महाजन फडणवीस यांच्या अग्रगण्य फळीतील बाळासाहेब भाजपातून दूर लोटले गेले, की सारले गेले, की त्यांना सोडून निघाले यापेक्षा जे घडलं त्याला आलेल्या मार्गातील ठेच समजून पुढील वाटचाल भाजपेयी म्हणून केली असती तर ? असा प्रश्र्न सर्वसामान्यांकडून विचारला जात होता ! जे घडले त्याला "संधी" म्हटले असते तर कदाचित बाळासाहेबांचे आजचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते का ? मात्र आज त्यांनी केलेल्या "वर्तृळाला" घरवापसी ही उपमा देऊन किंवा ज्यांनी आरोप करत तिकीट कापले त्याच फडणवीसांनी प्रवेश घडवून आणला आहे. राजकारणात पक्षांतर आणि पक्ष प्रवेश यांत आता कुठली "निष्ठा" दडली आहे असं जाणवत नाही ! बाळासाहेब यांनी भाजप-सेना-राष्ट्रवादी-भाजपा या वर्तुळाने आता काय साध्य होणार, नासिक मनपाच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत काय "बदल" घडणार, कोणती "संधी" प्राप्त होणार, "निवड" करीश्मा करणार ! हे येणारा काळच ठरवेल तूर्तास बाळासाहेबांना पुन्हा वजनदार राजकीय बस्तान बसविणे कष्टप्रद असेल का ?
"संधी," "निवड," "बदल".
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा