लासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
लासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न
संतोष गिरी यांजकडून,
नासिक: – लासलगाव येवला मतदार संघातील निफाड येवला तालुक्यातील ४६ गावातील मंडल पदाधिकारी नियुक्ती सोहळा येथील शिवमंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार होत्या तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा ताई जगताप यांनी केले. खासदार भारती पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी केंद्राच्या विविध योजनांचा उहापोह केला. मोदी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, लासलगाव जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी लासलगाव मंडल मध्ये विविध पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी निफाड मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, नामको चे माजी अध्यक्ष प्रकाश दायमा, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, लासलगाव मर्चंट चे माजी अध्यक्ष संतोष पलोड, रवी होळकर, योगेश पाटील, पंचायत समिती उपाध्यक्ष संजय शेवाळे सारिका डेर्ले, स्मिता कुलकर्णी ,संपत नागरे, राजेंद्र राणा, किशोर पाटील, अरुण भांबारे, प्रदीप माथा, बापू सोनवणे, राजेंद्र गांगुर्डे , ४६ गावातील पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपाचा प्रचार प्रसार तसेच पक्षाकडून येणारे उपक्रम, योजना सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचवण्यासाठी मंडल पदाधिकारी कार्यकारणी करण्यात आली मंडल अध्यक्ष डि के नाना जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ४६ गाव मंडल रचना करण्यात आली. मंडल अध्यक्ष महिला सौ स्मिता कुलकर्णी, युवा अध्यक्ष मंडल संदीप नागरे, यांची निवड करण्यात आली, आणि या वेळी वेगवेगळ्या आघाडी चे अध्यक्ष निवड करण्यात आले. वकील आघाडी ॲड माठा, व्यवसाय आघाडी राजू राणा, कामगार आघाडी रेणुका पोळ, किसान आघाडी भरत शिंदे, डॉ.आघाडी स्वनिल जैन यांची निवड करण्यात आली .लासलगाव अध्यक्ष योगेश पाटील, शैलजा भावसार, विंचूर महिला अध्यक्ष नेहा पुंड, टाळकी विंचूर सुनंदा साळवे, पिंपळगाव ( न) भारती महाले यांची निवड करण्यात आली. बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स चे पालन करीत कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमा नंतर सुरुची भोजन व्यवस्था करण्यात आली होती ,या वेळी व्यासपीठावर मंडल अध्यक्ष डि के नाना जगताप, जिल्हा अध्यक्षा सुवर्णा जगताप, कोशाध्यक्ष प्रकाश दायमा, प्रदेश सदस्य कैलास सोनवणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक संपत नागरे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष सारिका डेर्ले, उद्योगपती संतोष पलोड, निफाड मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, मंडल अध्यक्षा स्मिता कुलकर्णी,भटक्या विमुक्त सेल चे नितीन गोगले उपाध्यक्ष रविंद्र होळकर, शहर अध्यक्ष योगेश पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चाफेकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता प्रकाश दायमा यांच्या सुंदर आवाजात वंदे मातरम व राष्ट्रगीता ने झाली. या प्रसंगी
नितीन गोगले, राजू चाफेकर, राजू राणा, ज्योती शिंदे, रूपा केदारे, सिंधुताई पल्हार,किरण कुलकर्णी, नितीन शर्मा,उत्तम शिंदे,भरत शिंदे, बाळासाहेब रायते,ॲड माठा, संदीप नागरे, संतोष चौधरी, पूजा दायमा, रश्मी माठा, विद्या माठा, निलेश सालकाडे, महेश गिरी,भारती महाले, वेरुळे महाराज, आरती सोनवणे, शैला सोनवणे, सुनीता शिंदे, कविता आवारे, अनिता कांबळे, शैलजा भावसार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चाफेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश दायमा यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा