तब्बल १२० अनुकंपा धारकांना समक्ष बोलावून समुपदेननाने नियुक्ती ! कौतुकास्पद- कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेले प्रयत्न व प्रशासनाने घेतलेले परिश्रम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा अंतर्गत १२० अनुकंपाधारकांना समक्ष बोलावून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिचर, आरोग्य सहाय्यक, स्थापत्य अभियंता, शिक्षण सेवक, मुख्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक या रिक्त पदांवर सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात पारदर्शक पध्दतीने मोठया प्रमाणात  कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
           अनुकंपा अंतर्गत १२० उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये परिचर पदावर ४६, ग्रामसेवक पदावर १९, शिक्षण सेवक पदावर १२, पर्यवेक्षिका पदावर १, आरोग्य सेवक पदावर २८, आरोग्य सेविका १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, पशुधन पर्यवेक्षक २, स्थापत्य अभियंता सहाय्यक ५, कनिष्ठ अभियंता २ व विस्तार अधिकारी कृषी १ अशा ११८ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून २ पदांवर नियुक्ती आदेश देणे बाकी असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.
           जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वेळोवेळी कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सर्व विभागांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यात मोठया संख्येने कर्मचा-यांचे प्रश्न निकाली काढण्यात आले आहेत. विविध विभागातील कर्मचा-यांची पदोन्नती, दहा, वीस व तीस वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, अनुकंपा अंतर्गत नियुक्ती आदि कर्मचा-यांच्या जिव्हाळयाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. अनुकंपा अंतर्गत नियुक्ती करणेसाठी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, उप मुकाअ (ग्रापं) तसेच सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बगड, सचिन विंचुरकर ,मंगेश केदारे , किशोर पवार, प्रमोद ढोले, विशाल कामडी आरोग्य विभागाचे प्रकाश थेटे, पंडितराव कटारे आदिंनी परिश्रम घेतले. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सामान्य प्रशासन विभागात जावून याकामी गेल्या आठवडयापासून परिश्रम घेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
     दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ६९ परिचरांच्या विनंतीने बदल्या करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल