कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे मान्यवरांकडून कौतुक व सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेतील कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतूक केले. गुणवंत विद्यार्थीनींचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेत कष्टकरी तसेच शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थीनी शिक्षण घेतात. सन २०१९-२० मध्ये दहावी परिक्षेत बसलेल्या ६९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ८५.५० टक्के लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषदेचया मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. अश्विनी गांगुर्डे ही विद्यार्थीनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ही विद्यार्थीनी सर्वसाधारण कुटुंबांतील असून जातेगाव येथे आत्याच्या घरी राहुन शिक्षण घेत आहे. ८७.०० गुणांसह व्दितीय क्रमांकाने उत्तीण झालेली अनुजा मेढे ही वासाळी गावातील आहे. तर ८६.२० गुण मिळवून तृतीय आलेली आरती ससाणे ही राजुर बहुला येथील असून शेतकरी कुटुंबातील आहे. खो-खो खेळामध्ये राष्ट्रीय खेळाडू असलेली सुरगाणा येथील कौशल्या पवार हिने देखील ७९.८० गुण मिळविले आहेत. कष्टकरी कुटुंबातील या मुलींनी मिळवलेले यश इतरांना प्रेरणा देणारे असल्‍त्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विद्यार्थीनींचे कौतूक केले. कविता साठे यांनी विद्यार्थीनींचा परिचय करुन दिला. यावेळी प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ.वैशाली झनकर, कन्या शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सांळुके, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल