महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान !
नासिक::- न्यूज मसाला कडून प्रकाशित केलेल्या "बातमी अशी कुठे असते का ? या मथळ्याच्या बातमीची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड कडून तत्काळ घेण्यात आली होती, जागतिक महामारी कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर आॅनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात आले होते, सदर प्रमाणपत्र ओम व शिवानी या जुळ्या भाऊबहीणीला नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
        जुळ्या भाऊबहीणीला प्रत्येक विषयात वेगवेगळे गुण आहेत मात्र एकत्रित गुणांची टक्केवारी समान मिळाली, न भूतो न भविष्यती असेच वर्णन असलेली ही घटना.
         महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड कडून पाठविण्यात आलेले प्रमाणपत्र प्रदान करतेवेळी ओम व शिवानी सोबत त्यांचे पालक श्री व सौ सुनील बिरारी, न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, माय मराठी वृत्तवाहीनीचे सुनील निकम उपस्थित होते. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांना लीना बनसोड यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले, कोणत्याही क्षेत्रात शिक्षण पूर्ण करा मात्र आधी ध्येय निश्चित करा, ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा, पैसा-प्रसिद्धि पाठोपाठ येत असते असे सांगितले, सर्वांना मिठाई देऊन सत्कार केल्याने दोन्ही भाऊ बहीण एका आय ए एस अधिकारी यांनी दिलेल्या मोलाच्या सल्ल्याने भारावून गेले होते, त्यांचे आशीर्वाद घेऊन भविष्य घडविण्यासाठी नवीन ध्येयाने प्रेरित होऊन आनंदले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल