यंदा तरी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटणार का ? !!! !!!! न्यूज मसाला सर्विसेस ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
न्यूज मसाला सर्विसेस
यंदा तरी रासाकाचे बाॅयलर पेटणार का ?
नासिक::-निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांचा अवघ्या दोन महिन्यावर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश हे दोन साखर कारखाने सोडले तर निसाका, रासाका, गिसाका, वसाका, रावळगाव, के.जी.एस. सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागणार आहेत, त्यासाठी यंदा तरी रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटलेच पाहिजेत या मागणीवरून आक्रमक होत रासाका कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे, वर्षाच्या सुरवातीला निसाका रासाका सुरु होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन निवडणुकीपुर्वी दिलेले निसाका, रासाका सुरु करण्याचे आश्वासन कारणीभुत आहे, तसेच कोरोना महामारीमुळे कादवा गोदा खोऱ्यातील उत्पादीत ऊसाला असलेल्या रसवंती, चाऱ्याच्या बाजारपेठा बंद, ऊसतोड करण्यासाठी कामगारांबरोबर ऊस उत्पादकांना करावी लागणारी तडजोड अशा कारणांमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहिला, सैन्य पोटावर चालते या उक्तीप्रमाणे ऊसाला ऊठावच नसल्याने ऊस उत्पादक कुटुंबीयांचे अर्थकारण कोलमडले, सत्तापालट झालेला असल्याने कारखान्याचे धुराडे पेटविण्याच्या मागणीने जोर धरला होता, त्यातुनच निफाड तालुक्याच्या नेत्यानी पिंपळगाव बाजार समितीत वनाधिपती विनायकदादा पाटील व रासाकाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्वपक्षीय बैठक घेत कारखाने सुरु करण्यासाठी एकजुट दाखवली, मात्र हंगाम समोर येऊन ठेपला असल्याने निसाका नाही, निदान रासाकाचे बाॅयलर यंदा तरी पेटावे असे शासन दरबारी रासाका कृती समितीने निवेदन दिले. थेट साखर आयुक्तांची भेट घेत रासाका सुरु करण्यासाठी साकडे घातले आहे.
--------------------------------------
प्रतिक्रिया
--------------------------------------
प्रतिक्रिया
सोमनाथ बोराडे स्वाभीमानी शेतकरी संघटना
रानवड सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा म्हणून आम्ही अनेकदा आंदोलने केली, साखर आयुक्तांच्या दरबारात ठाण मांडून बसलो, याबाबत कामगारांना सोबत घेऊन शासनाला जेरीस आणले, परंतु कारखाना सुरू होऊ शकला नाही. महाविकास आघाडी सरकारने कारखान्याचे धुराडे पेटवून कामगार, सभासद, ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
--------------------------------------
नामदेवराव शिंदे, अध्यक्ष रासाका बचाव कृती समिती,
निसाका व रासाका सुरू व्हावेत म्हणून तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र आले ही चांगली बाब असली तरी अजूनही काही हालचाल होत नाही, म्हणून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून याविरोधात रान पेटवणार आहोत यंदाच्या हंगामात कुठल्याही परिस्थितीत कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे.
----------------------------------------
दिलीपराव गवळी रासाका कामगार
कारखाना बंद असल्याने आमच्या कामगारांची रोजीरोटी थांबली आहे. कारखान्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली तरी मायबाप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रासाका कारखाना सुरू झालाच पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने निर्णय घेऊन लवकरात लवकर कसा कारखाना सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे.
----------------------------------
मालोजीराजे रामनाथ कुशारे सावंरगाव ता निफाड रासाका सभासद
कोरोना मुळे मागील वर्षाचा निफाड तालुक्यातील साडेचार हजार हेक्टर ऊस शिल्लक असताना यंदाचा साडेपाच हजार हेक्टर ऊस गाळपासाठी आहे अशातच जिल्हाभरातील कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची कोंडी झाली आहे म्हणून निफाड तालुक्यातील निसाका, रासाका, के. जी.एस, सुरू होणे गरजेचे आहे त्यासाठी आजी-माजी आमदारांनी दाखवलेली एकजूट चांगली असली तरी त्याचे रूपांतर कारखाने सुरू होण्यात व्हावे हीच अपेक्षा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा