रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी ! प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम किट्सचे वितरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801,.
रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी !
नाशिक - कोरोना योद्ध्यांनी केलेल्या बहुमूल्य अनमोल कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. हा त्यांचा स्तुत्य उपक्रमच आहे. परंतु त्या बरोबरच या योध्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्हीएलटीएमच्या किटचे वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट तर्फे होत आहे.
नाशिक व नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिकांना परिषदा व महानगरपालिकांना व्हीएलटीएम या किट्सचे वितरण करून एका भव्य व उदात्त हेतूसाठी रोटरी क्लब कार्यरत आहे.
सामान्यत: नाकातील आणि घशातील नमुने साठविण्यासाठी (व्हीएलटीएमच्या) व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम किटस काचेच्या सिलेंडरचा वापर होतो. तदनंतर हे कोविडचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. परंतु हे करत असतांना असे निदर्शनास आले कि, या कोरोना पद्धतीने काम करत असतांना कोरोना योध्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना योध्यांची जोखीम कमी करण्याचा भाग म्हणुन ही महत्वपूर्ण व आवश्यक बाब लक्षात घेऊन व्हीएलटीएमच्या किट्स हे अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे. कारण या किटस वापरले गेलेल्या घटकांमुळे विषाणू उदासीन होते, परंतु अनुवंशिक गुणसूत्रे टिकून राहतात. आरोग्य प्रणाली द्वारे या प्राणघातक विषाणू विरुद्ध लढणार्या कोरोना योद्ध्यांना सक्षम व योग्य ते साधन म्हणजेच व्हीएलटीएमचे किट देऊन सहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता प्राप्त आहे असे रमेश मेहर यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा परिषद येथे व्हीएलटीएमच्या किट्सचे वितरण नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, रोटरी क्लबचे रमेश मेहर यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, प्रकल्प संचालक डॉ.सुरेश उप्पलवार, डॉ. जयदीप सुर्यवंशी, रोटरी अध्यक्ष विनायक बेडीस, रोटरीचे सचिव अजित गुप्ता, डॉ. जयदीप सोमवंशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरीचे अरुण काळे, अनुराग श्रीवास्तव व क्लबच्या समस्त सदस्यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा