न्यूज मसाला अंक दि. १३ आॅगस्ट २०२०,. संपादकीय- पत्रकार महापूरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! 7387333801, न्यूज मसाला संपर्क भ्रमणध्वनी !!!
संपादकीय
पत्रकार महापुरावर लिहीता लिहीता वाहून गेला !
समृद्ध मराठी भाषेतील म्हणी,
"दिव्याखाली अंधार"
"आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना"
"वैद्याचं पोरगं पांगळं"
अर्थ सर्वसामान्यांसाठी खूप काही सांगून जातो मात्र पत्रकारिता क्षेत्रात या म्हणी फक्त वापर म्हणून वापरायच्या असतात काय ?
जगाला प्रकाशाकडे नेणारा पत्रकार इतका उपेक्षित असू शकतो हे आजच्या परिस्थितीने त्याला त्याचे अस्तित्व दाखवून दिले, अरे बाबा आधी तुझ्या बुडाखाली अंधार असताना तू जो प्रकाश दाखवतो त्यावर किती विश्र्वास ठेवावा ?
माध्यमांचे मालक यांनाच प्रती आईबाप मानणारी पत्रकार जमात इतकी "निर्बुद्ध" असू शकते की मालक आई जेवू घालेना आणि मालक बाप भिक मागू देईना तरीही शांत बसू शकतो यापलीकडे त्याच्या हाती कोणताही निर्णय घेऊ शकण्याची शक्ती नसणे ही शोकांतिकाच आहे.
सामाजिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा वैद्य-पत्रकार आपल्या स्वत:च्या कुटुंबासाठी एका पांगळ्या जबाबदारीचा बाप गणला जावा यांसारखे दुर्देव काय ?
माध्यमांनी जाहीराती मिळविण्याचा जो बाजार मांडला होता तो कोव्हिड-१९ ने उघडा पाडला ! चौथा स्तंभ व त्याचा मी पाईक आहे हे किती मोठे मृगजळ होते हे आज सिद्ध झाले. जाहीरात विभाग स्वतंत्र अस्तित्व हळूच गमावून बसला, पत्रकारालाच काही टक्के कमिशन देऊन दोन्ही बाजू सांभाळण्याची जबाबदारी सोपविली गेली तेव्हा कुणीही पत्रकार याविरूद्ध अवाक्षरही काढू शकला नाही, पगाराव्यतिरिक्त कमिशन मिळू लागले म्हणून त्याची लेखणी आपोआपच बोथट होत गेली आणि हेच मालक वर्गाला काही प्रमाणात अपेक्षित होते, वेळीच यांवर "मोठ्ठा पत्रकार", तथाकथित पत्रकारांचा नेता म्हणून मिरवणाऱ्या लबाडांनी "पत्रकारितेचे" अस्तित्वावर एक दिवस बुलडोझर फिरवला जाऊ शकतो याबाबत आवाज उठवला असता तर ही वेळ आली नसती असे आता सर्वच पत्रकार बोलू लागले आहेत पण माध्यमांमधून व्यथा मांडू शकत नाही हा "मोठा विनोद" जनसामान्यांच्या मनात आला नसल्यास नवलच !
अनेक पत्रकारांच्या नोकरी वर बालंट आले, अनेक माध्यमांच्या मालकांनी आपल्या आवृत्त्या बंद केल्यात मात्र मुळ आवृत्ती मनुष्यबळ कपात करुन सुरू ठेवल्या आहेत, एखाददुसरा अपवाद वगळता कोणतेही वृत्तमाध्यम बंद पडलेले ऐकीवात नाही, "टाळी एका हाताने वाजत नाही" असे वर्णन केले तर ?
मजेठीया आयोग लागू केला जात नाही, किमान वेतन व नोकरीची शाश्र्वती नाही, आॅनरोल पगार सर्वांना मिळत नाही, कायद्याच्या चौकटीत राहून नोकरीवरून कमी केलेले "पत्रकार" कुठेही दाद मागू शकत नाहीत ! आणि कालपर्यंत तोच पत्रकार इतर आस्थापनांवर रकानेच्या रकाने भरून लिहीत होता, त्यामुळे अनेक आस्थापनांची वेठबिगारी संपुष्टात आली मात्र स्वता:साठी "वाघापुढील हतबल शेळी" सारखा गलीतगात्र झाला आहे.
इतरांसाठी काय बातमी देत असे एकेकाळी, "हमारी मांगे पुरी करो", "कायमस्वरूपी नोकरी मिळालीच पाहिजे", "कामगार एकजुटीचा विजय असो", "कामबंद आंदोलन", "ठिय्या आंदोलनाचा .. वा दिवस", नही चलेगी, नहीं चलेगी, मालकशाही नहीं चलेगी", "किमान वेतन मिळालेच पाहिजे",
आणि पत्रकार "मुग गिळून गप्प बसले", आजही "जात्यातले अन् सुपातले", फरक आहेच, म्हणतात ना "शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारच्या घरात", पत्रकारांनो आता तरी जागे व्हा, मालक हा घटक वेगळा आहे, मालक त्याच्या जागी योग्य भूमिकेत असेल तर पत्रकारही स्वतंत्र भूमिकेत वावरताना दिसावा, पत्रकारितेचे माझे कर्तव्य पार पाडतो, त्याचा मोबदला मिळणे हा माझा हक्क आहे, मी मालक नाही हे आधी मान्य करा पण गुलाम नाही हेही मनी बाळगले तर पत्रकाराने आणलेली बातमी "डस्टबीन" मध्ये कोणतेही "ताटाखालचे मांजर" फेकण्याची हिम्मत करणार नाही व कोणताही मालक स्वता:च्या स्वार्थासाठी "मांजर" पाळणार नाही, अशावेळी पत्रकारांचे मजबूत संघटन असेल तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेताना अभिमानाने छाती फुगल्याशिवाय राहणार नाही !
शिवाजी महाराज शेजारी तरी जन्माला आले आहेत, अखिल भारतीय प्रसार माध्यम पत्रकार संघ या नावाने एकत्र आलेल्या पत्रकारांनी यासंदर्भात नासिकच्या मे. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. संघ, संघटना, परिषद, महासंघ, सुरक्षा समिती, काय काम करतात याचा उहापोह करायचा त्यांनी करावा पण "पत्रकार" या एका शब्दासाठी जर एकत्र राहीलात तर अशी वेळ कुणावर येणार नाही इतकंच !

मे. जिल्हाधिकारी, नासिक यांना अखिल भारतीय प्रसार माध्यम पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनाची बातमी याच अंकात देण्यात आली आहे.
पत्रकारितेचे वास्तव जगापुढे आणलं आपण, यात स्तुत्य बाब म्हणजे एका दैनिकाने हे प्रसिद्ध करणे म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. एरवी कुणी या विषयाला कुणी हात घालत नाही. वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणजे फक्त जाहिरात रुपात व्यवसाय देण्याचे एक माध्यम होऊन बसले आहे. ही परिस्थिती कुठलाही पत्रकार नाकारू शकत नाही.
उत्तर द्याहटवा