आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली !! न्यूज मसाला संपर्क क्रमांक 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नाशिक- जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांमुळे बदली प्रक्रिया केल्यास आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली आहे. नियमानुसार आपसी बदल्या १० ऑगस्टपर्यत करण्यात येणार आहे.
                     शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार वर्ग ३ संर्वगातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभाग निहाय बदली प्रक्रियेचा आढावा घेतल्यावर गेल्या चार वर्षापासून पदभरती न झाल्यामुळे तसेच आरक्षण पदावरची पदोन्नतीबाबत शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठया प्रमाणात पद रिक्त असल्याचे निर्दशनास आले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये सध्या पदे रिक्त असून विनंती बदलीने पुन्हा आदिवासी क्षेत्रातीलच पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय बदलीने बिगर आदिवासी क्षेत्रातून मोठया प्रमाणात बदल्या कराव्या लागतील. त्यामुळे बिगर आदिवासी क्षेत्रातील पदे मोठया प्रमाणात रिक्त होऊन त्या भागातील समतोल बिघडेल असे संवर्गनिहाय संबंधित खातेप्रमुखांनी निर्दशनास आणून दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने परिपत्रक काढून जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग ३ मधील विविध संवर्गातील सन २०२० मधील सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली आहे. नियमानुसार विनंतीनुसार आपसी बदल्या १० ऑगस्टपर्यत करण्याचे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल