उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग ! रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार-स्तुत्य उपक्रम !! !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
नाशिक- ग्रामीण भागातील रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजारच्या माध्यमातून शहरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आज नाशिक पंचायत समिती आवारात आयोजित रानभाज्या महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीनच तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते.
रानभाज्या महोत्सवास १३ महिला स्वयंसहायता समूहांनी आणि ३ शेतकरी उत्पादक गटानी सहभाग नोंदविला .पहिल्याच प्रयत्नात ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून रानभाज्या आणि इतर सेंद्रिय भाज्यांचा हा महोत्सव प्रत्येक रविवारी पंचायत समिती नाशिक आवार, त्र्यंबकरोड, बांधकाम भवन समोर,नाशिक येथे भरविला जाणार आहे.
शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी व त्यांचे औषधी गुणधर्म सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती व्हावे, ग्रामीण भागातील बचत गट व शेतकरी यांच्या मालाला बाजारपेठ निर्माण व्हावी ही या उपक्रमाची संकल्पना आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके, गट विकास अधिकारी सारिका बारी, सहायक गट विकास अधिकारी विनोद मेढे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा