सामाजिक कोरोना संपला काय ! कुठे गायब झालेत मदत करणारे राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते ? उत्तर हवंय, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

सामाजिक कोरोना संपला काय ! कुठे गायब झालेत मदत करणारे राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते ?
जागतिक महामारी कोरोना उर्फ कोविड-१९ ने जगात डिसेंबर १९ पासून धुमाकूळ माजवायला सुरूवात केली, अनेकांचा जीव घेतला, अनेक कुटुंबे देशोधडीला लागण्याची चिन्हे असताना त्यांना आधार द्यायला सामाजिक, राजकीय हात सरसावले होते. कुठे गेलेत सारे आता ? हा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर आपणच शोधायला हवे, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी कुठे लपले नाहीत, त्यांची वृत्तीही बदलली असावी असे नाही, त्यांच्याकडील पैसा संपत्ती संपली असे ही नाही, मग मार्च- एप्रिल मधील त्यांची सामाजिक दानशूरता आज का दिसत नाही ? आणि का दिसावी ?
            जनहो, राजकारणी किंवा सामाजिक संस्था, व्यक्ती त्यांच्यापरीने जी मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत होते तीचा विपर्यास केला गेला. तो कुणी केला ? आपणच ना ? कोरोना संपला नाही, लस आजही उपलब्ध झालेली नाही, कधी येईल याची शाश्वती नाही (मात्र येणार हे निश्चित), अशी परिस्थिती असताना आपण स्वत:वर जी बंधने घालायला हवी होती ती स्विकारली नाहीत याचाच परिणाम राजकारणी, सामाजिक संस्था,व्यक्ती बाजारातून अचानक गायब झाली. पुण्याचे महापौर, नासिकच्या माजी महापौर, अनेक शहरांतील नगरसेवक, राज्याचे मंत्री, आमदार यांच्यासह आरोग्य कर्मचारी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस दलातील नोकरदार कोरोना पाॅझिटीव्ह झालेले दिसतात, काहींनी जनसेवा करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले याचीही लाज विनाकारण किंवा किरकोळ बाबीकरता बाहेर पडणाऱ्यांना वाटत नाही याचमुळे खरे कोविड योद्धा आज दिसत नाही याचा विचार कोणी करते का ? करणार आहात का ?
         जनहो, न्यूज मसालाची मोहीम, "घरी रहा-स्वस्थ रहा-साऱ्यांसह आनंदाने", आजही वेळ गेलेली नाही, सावध व्हा ! व्हायचंच नसेल तर प्रशासन, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते हतबलता व्यक्त करतील तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल !
          जनहो, भारत सरकार, राज्य सरकारे आपल्या जनतेच्या जीविताची काळजी घेत आहेत, अन्नधान्याचा तुटवडा भासू देत नाही, १५० कोटी लोकांचे कुटुंब सांभाळत देशाच्या सरहद्दीवर लक्ष ठेवून आहे, तारेवरची कसरतही अशा वेळी सहजसाध्य समजली जाते यावरून आपण अंदाज करायला हवा की, देश किती मोठ्या संकटातून मार्गक्रमण करीत आहे, घरात बसलेल्या काही अतिविद्वान मेंदूकडून राजकारण केले जात आहे, प्रशासनाला अक्कल शिकविली जाते हे अनाकलनीय आहे. आज कोरोनाच काय इतर आजारी व्यक्तींनाही दवाखान्यात जागा शिल्लक राहीली नाही, हाच वेग दहा वीस टक्क्यांनी वाढला तर परिस्थिती कशी असेल ? संयमाने राहील्यास कोरोना काय त्याचा बापही आला तर आपण सर्व भारतीय त्याला हरवू शकतो फक्त काही काळ राजकारण गेलं चुलीत म्हणत प्रशासकीय आदेश हिच आकाशवाणी समजून तिचे पालन करुया ! भारतीय सेना, प्रशासकीय कोविड योद्धा, आणि शेतकरी यांचा हौसला वाढवूया !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल