बातमी अशी कुठे असते का ? एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान गुण !! हेच विशेष आहे या बातमीत, खालील लिंकवर क्लिक करून वाचा व कमेंट बाॅक्समध्ये अभिप्राय नोंदवा !!!

           
        
        नासिक::- येथील बाॅईज टाऊन शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान ८८.२०% गुण मिळाले. यांत काही विशेष नाही असे आपल्याला वाटत असेल तर ही बातमी वाचायलाच हवी.
        ओम आणि शिवानी यांनी जे समान गुण मिळविले हा नासिक नव्हे तर जगभरातील तमाम वाचकांसाठी कुतुहलाचा व चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला कारणही तसेच आहे, असा विक्रम भविष्यातही लवकर घडेलच असं छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही.
          नाशिक येथील आई इव्हेंट्स या संस्थेचे संचालक सुनील बिरारी हे मूळचे पाळे ता.  कळवण येथील असून सध्या व्यवसायानिमित्त वास्तव्यास नाशिक येथे आहेत. यांचे जुळे मुलगा व मुलगी (भाऊ बहीण) यांना इयत्ता दहावी शालांत परीक्षेत (२०१९-२०) दोघांनी समान (८८.२०%) गुण मिळविले आहेत, विश्वात अनेक विक्रम प्रस्थापित होत असतात मात्र असा विक्रम प्रथमताच घडल्याचे दिसून येते व भविष्यात लवकर कधी होणार हे सांगणे शक्य नाही,  कौतुकास्पद बाब तसेच हा विशेष योगायोग आहे.
     जुळ्यांचा चेहरा राम और शाम असतो असे अनेक चित्रपटात वा वास्तवात आढळून येते, मात्र मुलगा आणि मुलगी हा जन्मताच बदल असलेले ओम आणि शिवानी यांच्या स्वभावात दैनंदिन जीवनात, बदल राहणारच पण बौद्धिक क्षमतेत सारखे ठरणे हे कसे शक्य आहे ? या असामान्य कर्तृत्ववान जुळ्यांची चर्चा झाली नाही तर नवलच !
न्यूज मसाला परीवारातर्फे ओम सुनील बिरारी व शिवानी सुनील बिरारी यांनी भविष्यात आणखी विक्रम नोंदवावे यासाठी खूप खूप शुभेच्छा !


टिप्पण्या

  1. खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे
    दोन्ही मुलांचे व आई वडील यांचे अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  2. दुर्मिळ घटना !!
    ओम आणि शिवानी बिरारी यांचे या अभूतपूर्व यशाबद्दल हार्दिक अभिनंदन .!!!



    उत्तम निरभवणे
    मा.केंद्रप्रमुख जि.प .नाशिक


    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल