वय वर्षे फक्त ६८ ! विहिरीत जलयोग करणार्या योगपटू प्रकाश बेल्लद यांची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
६८ व्या वर्षीही विहिरीत जलयोग करणार्या योगपटू प्रकाश बेल्लद यांची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद
कोल्हापूर::-कब्बुर येथील योगपटू प्रकाश बेल्लद (जन्म १९ एप्रिल १९५३) यांची ३३ वर्षांपासून जलयोगसाधना सुरू आहे. योगासनामध्ये जलयोग सर्वाधिक कठीण मानला जातो. पण, कब्बुर, तालुका चिक्कोडी येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ योगपटू गेल्या ३३ वर्षांपासून १०० फूट खोल विहिरीत जलयोग करत आहेत. पाण्यात सरळ थांबून केला जाणारा स्तंभासन हा योग प्रकार अवघड आहे. त्यासाठी खूप सराव करावा लागतो. आपली कला इतरांनाही शिकवण्यात योगपटू प्रकाश बेल्लद धन्यता मानतात. त्यांनी आजपर्यंत ५०० पेक्षा अधिक मुलांना पोहण्याचे व जलयोगाचे धडे दिले असून सध्या ते अत्यंत निरोगी जीवन जगत आहेत, पूर्वी ७७ किलो असलेले त्यांचे वजन आज ६४ किलो असून; त्यांनी आपली पत्नी सौ. जयश्री बेल्लद यांच्यासह देहदानाचा संकल्पसुद्धा केला आहे.
योगपटू प्रकाश बेल्लद यांनी आपले संपूर्ण जीवन योगासाठी वाहून घेतले आहे. अन्य व्यक्ती जमिनीवर करत असणारी कठीण योगासने ते अगदी सहजरीत्या १०० फूट खोल विहिरीच्या पाण्यावर तरंगत करतात. यात पद्मासन, पर्वतासन, गरुडासन, वृक्षासन, शवासन, गोमुखासन असे अनेक जलयोगासने सहजपणे करतात. विशेष म्हणजे त्यांना कोणीही योगगुरु नसून केवळ दूरदर्शनवर पाहून पाण्यात पोहण्याचे वेगवेगळे प्रकार आणि योगासने ते शिकले आहेत.
योगपटू प्रकाश बेल्लद यांचा हा उपक्रम योग विश्वातील खरोखरच अनोखा ठरला असून त्यांच्या उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
योगपटू प्रकाश बेल्लद यांच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या या विशेष राष्ट्रीय विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा