आज होणाऱ्या सुर्यग्रहणाचे राशीनुसार फल काय आहे ! जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

कंकणाकृती सूर्यग्रहण
रविवार दि. २१ जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड,
दक्षिण युरोपचा काही भाग आणि आॅस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशांमध्ये ग्रहण दिसणार आहे.
पृथ्वी, चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच रेषेत येतात तेव्हा जी आकाशिय स्थिती निर्माण होते तिला सुर्यग्रहण म्हणतात, पृथ्वीपासून चंद्र कमाल अंतरावर असतो तेव्हा कंकणाकृती ग्रहण म्हटले जाते, राजस्थान, पंजाब, हरियाना व उत्तराखंडातील काही प्रदेशात कंकणाकृती अवस्था पाहाण्यास मिळेल. पृथ्वीपासून किमान अंतरावर चंद्र असल्यास खग्रास सूर्यग्रहण होते, यांत सूर्य पुर्णपणे झाकला जातो, 
शनिवार दि. २० जून रोजी रात्री १० पासुन ते ग्रहण मोक्षापर्यत अर्थात भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० ते २:०७. (वेगवेगळ्या ठिकाणांहून मोक्षवेळेत बदल राहील)  वेध पाळावेत. बाल, वृध्द, आजारी, अशक्तव्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी रविवारी पहाटे ४ वा.४५ मि.पासुन ग्रहण मोक्षापर्यत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, नित्यकर्म, देवपुजा, श्राध्द, ही कर्मे करता येतात तर काहींच्या मते ही कर्मे वर्ज मानली जातात. वेधकाळात पाणी आणि झोप घेता येते. ग्रहणपर्व काळात खाणे, पाणी ‌व झोपणे कर्म करू नये असे शास्त्रानुसार सांगितले जाते.
ग्रहणाचे राशिपरत्वे फल:  मेष, सिंह, कन्या, मकर या राशींना शुभफल. वृषभ, तुला, धनु, कुंभ, या राशीना मिश्रफल. मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन या राशीना अनिष्टफल आहे. ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.
ज्योतिष शास्त्रानुसार अनेक मतप्रवाह असू शकतात, मात्र सर्वसाधारण ग्रहणाचा काळ, शुभाशुभ, फलप्राप्ती, हे सांकेतिक दृष्टीने समान असते, ग्रहण स्पर्शापासुन ते मोक्षापर्यतचा काळ पुण्यकाळ मानावा असे ही सांगितले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !