ग्रामपंचायतींशी आॅनलाईन पद्धतीने संवाद साधणे सुरू ! राज्यातील पहीलाच उपक्रम कुठे अंमलात आणला गेला !! जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

                नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतींशी संवाद साधणे सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातुन सरपंच,उप सरपंच पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला जात असून कोरोनाबाबत तसेच विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यात येत आहे. अशाप्रकारे थेट ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी ऑनलाईनद्वारे संवाद साधण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून याद्वारे कोरोनाबाबत उपाययोजना तसेच लॉकडाउनमुळे रखडलेली विविध विकासकामे पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमतीलीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. दररोज दोन किंवा तीन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींशी  विडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन संपर्क करण्यात येत असून यामध्ये विविध विषयांचा आढावा तसेच मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यामध्ये ग्रामपंचायत विभाग अंतर्गत १४ वा वित्त आयोगाचा आखर्चित निधी, १५ वित्त आयोगाचा आराखडा, जन सुविधा व नागरी सुविधांची कामे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अपूर्ण कामे, सन २०२१-२२ चा वार्षिक कृती आराखडा. आरोग्य विभाग अंतर्गत कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राबविलेल्या योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत घरकुल योजना, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान आढावा, समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित घटकांसाठीच्या योजना, दिव्यांग कल्याण निधी खर्च, पाणी व स्वच्छता विभाग अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी व पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्रम, महिला व बालकल्याण विभागांतर्गत कुपोषण निर्मूलन, अंगणवाडी बांधकाम, शिक्षण विभागांतर्गत शाळा दुरुस्ती,शालेय वेळापत्रक, कृषी विभागांतर्गत बी- बियाणे, खते, कीटकनाशके वितरण व उपलब्धता व पशुसंवर्धन विभागांतर्गत पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी या प्रमुख विषयांबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी दिली.
दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्समुळे गावातील अपूर्ण असलेली  विविध विकासकामे, पाणी टंचाई, आरोग्य सुविधा, स्वच्छते संदर्भात तातडीने मार्ग काढून सुविधा पुरवण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात येत आहे.
अडचणी सोडविण्याचा प्रयत्न- बाळासाहेब क्षीरसागर
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी कोरोनाच्या या संकटकाळात चांगले काम केले आहे. ग्रामीण भागात विकासाची गाडी रुळावर आणणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे विविध विषयांबाबत प्रत्यक्ष आढावा घेणे शक्य नसल्याने नाशिक जिल्ह्याने ऑनलाईनद्वारे ग्रामपंचायतीशी संवाद साधणे सुरू केले आहे. याद्वारे  विविध घटकांबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून ग्रापस्तरावरील विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
नाशिक जिल्ह्यात पहिलाच उपक्रम- लीना बनसोड
नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन प्रणाली द्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचतींशी संपर्क साधून विविध मुदयांबाबत माहिती तसेच आढावा घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापुढे बैठका, कार्यशाळा आयोजित करणे शक्य नसल्याने ऑनलाईनद्वारेच ग्रामपंचायतीच्या विविध कामांचे सनियंत्रण करण्यात येईल. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणकावरच व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

  1. चांगला उपक्रम. त्यामुळे प्रशासन योग्य वेग घेईल. जनतेची अडवणूक होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !