सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......! माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करणाऱ्या सैनी जोती च्या कुणाची वर्णी लागली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

विजय राऊत यांची सैनी जोती महासंघाच्या  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड......

              नाशिक:  देशभरातील माळी समाजाचे राष्ट्रीय संघटन मजबूत करण्याचे काम सैनी जोती महासंघ करत आहे. या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रामधून विजय राऊत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

        माळी समाजाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाज संघटनाच्या माध्यमातून राज्यभरात कामाचा वेगळा ठसा उमटवला असल्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्साहात पार पडली असून या बैठकीमध्ये देशातील विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये समाजाच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सैनी जोती महासंघाचा देशभरात दौरा करण्यात येणार असल्याची माहिती विजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. ब्रिजेश ट्विकल सैनी, संवरक्षक ताराचंद गेहलोत, मोतीबाब साखला, उत्तराखंड धर्मवीर सैनी, मुरली बालन, महेश सैनी मध्यप्रदेश, मुन्नालाल सैनी छत्तीसगड, अनिल सैनी पंजाब, आझाद सैनी दिल्ली, सुभाष चंद्र उत्तरप्रदेश यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !