अनेक दिवसांपासून गोदावरी नदी ला लागलेलं पानवेलींच ग्रहण आम. बनकरांच्या प्रयत्नाने सुटले ! जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांची प्रतिक्रिया !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


संतोष गिरी, निफाड यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,
अनेक दिवसांपासून गोदावरी नदी ला लागलेलं पानवेलींच ग्रहण सुटले !
आमदार दिलीपराव बनकर यांच्या पाठपुराव्याला यश
पानवेली काढण्यास सोमवार पासून झाली सुरवात
            नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या गावांसाठी  आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रयत्नातून  जलसंपदा विभागाच्या वतीने पानवेली काढण्यास सुरवात करण्यात आली आहे.  नागरिक,शेतकरी व पर्यावरण प्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे. नासिक शहरात तून सांड पाणी व कारखान्यातुन गोदावरी नदी पात्रात सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी या मुळे गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते, यामुळे पानवेली तयार होतात. या  पानवेली वाढीचा वेग कमी कालावधीत संपूर्ण गोदावरी चे पात्र व्यापून टाकतात. पानवेली नांदूरमध्यमेश्वर ते शिलापूरच्या जवळपास ३० किलोमीटर पर्यंत गोदेच्या पात्रात दरवर्षी पसरलेल्या असतात, पानवेली  मुळे, जलचर प्राणी मात्राचे अस्तित्व धोक्यात येत असते. तसेच पाणी ही प्रदुषित व  खराब होते. पानवेली लवकर नष्ट होत नाही. पावसाळ्यात पाणवेली अधिक अडसर ठरतात. इगतपुरी-त्रंबकेश्वर ,नाशिक शहरात जोरदार पाऊस होतो, त्यामुळे गंगापूर व दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो, यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ होऊन चांदोरी-सायखेडा पूल, करंजगाव-कोठुरे पुलाला अडकून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करून पुरजन्य परिस्थितीने दरवर्षी चांदोरी, सायखेडा परिसरातील शेतात व गावात पाणी शिरून आर्थिक व कधी मनुष्य हानी होते,गोदावरील  पुलाला धोका निर्माण होतो, सदर बाब आमदार दिलीपराव बनकर यांच्या  लक्षात आल्याने त्यांनी नांदुरमध्मेश्वर धरणाच्या नवीन आठ गेटचा प्रश्नाबरोबर जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले, जलसंपदा खात्याचे मंत्री जयंत  पाटील यांच्या कडे पाठपुरावा केला व  ही समस्या कथन केली, स्थानिक नागरिकांनी वारंवार केलेल्या मागणीचा  बनकर यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा व मागणी करून या पाणवेली काढण्याचा मार्ग मोकळा केला
या आठवड्यात सोमवार पासून जलसंपदा विभागाकडून पाणवेली काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पाणवेली काढण्यास सुरवात झाल्याने शेतकरी व पर्यावरण प्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांची प्रतिक्रिया
गोदावरीच्या पात्रात असलेल्या या पाणवेली मुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले होते व  पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढते आणि पानवेली पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण करतात त्यामुळे जवळील शेतात व गांवात पाणी शिरते, पिकांचे नुकसान होते, पानवेली काढण्यास सुरवात झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
----------  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !