महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात... शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणपत्रकाचे केले वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
संतोष गिरी, निफाड, यांजकडून
निफाड तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरुवात...
आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप.
नासिक::-महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि.३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या व दि.०१ एप्रिल २०१५ ते दि.३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्याची घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरुवात झालेली असून त्याचा शुभारंभ निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
यादीनुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत असून प्रमाणपत्र पात्र झालेल्या शेतकरी सभासदांना शासनातर्फे शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण करताना सोप्या, सुटसुटीत अशा पद्धतीने बँक खाते क्रमांक, आधार कार्ड व बोटाचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे. सदर प्रक्रिया २ मिनिटांच्या आत पूर्ण होत असून लाभ मिळाल्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. निफाड तालुक्यात या योजनेमध्ये एकुण २ लाखापेक्षा कमी कर्ज असलेले १३९८४ शेतकरी सभासद असून त्यांचे सुमारे १३३ कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तसेच २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या ६१२२ शेतकरी सभासदांना १८२ कोटी ६७ लाख ८ हजार इतकी कर्जमाफी होणार आहे. सदर आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. प्रमाणपत्र वाटपाप्रसंगी आमदार दिलीपराव बनकर, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र निकम, सहाय्यक विभागीय अधिकारी अविनाश महाजन, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश खोडे, बापू गडाख, बँक इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर वाटपाडे, नंदू तासकर, जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक गरुड, सोनवणे, पवार, ढोमसे, पिंपळगाव सोसायटीचे सचिव नितीन कर्डेल आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते.
---------------------------------
प्रतिक्रिया
दिलीपराव बनकर आमदार निफाड
निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आप आपल्या सोसायटी वा जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बॅंक मध्ये जाऊन आपल्या कर्ज योजने बाबत चर्चा करून प्रमाणिकरणपत्रक लवकरात लवकर पूर्ण करून आपलं थकीत कर्ज माफ करून नवीन कर्ज आपल्या शेतीसाठी उपलब्ध करून घ्यावं असं आवाहन तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने केलं आहे
,----------------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा