शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेला कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट ! तरूणांकडून आदर्शाची रुजवणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
संतोष गिरी,
निफाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस
_____________________________________
शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी रायतेवस्ती शाळेला कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट,
विकास रायते व संतोष रहाणे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम
निफाड::- तालुक्यातील उत्तर पुर्व पट्ट्यातील खडकमाळेगाव येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती शाळेस जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते व शिक्षणप्रेमी तरूण संतोष रहाणे यांनी "माझा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत" या उपक्रमातंर्गत वाढदिवसानिमित्त थर्मल स्कॕनर, हँड फ्री सॕनिटायझर स्टँड भेट दिले तर बालरोगतज्ञ डॉ.मंगेश रायते यांनी सर्व विद्यार्थ्यांना मास्क भेट दिले.
१५ जुन रोजी नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात कधी सुरू याबाबत अनिश्चितता आहे परंतु शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आवश्यकता लक्षात घेत साहित्य भेट दिले.
गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद असल्याकारणाने शाळा निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराइड उपलब्ध करून दिले. यावेळी डॉ. मंगेश रायते यांनी प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी,थर्मल स्कॕनरचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.तर ऋषीकेश रायते यांनी शाळा परिसराचे निर्जंतुकीरण केले..
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब क्षिरसागर यांनी शाळेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली..यावेळी संजय राजोळे,डॉ. मंगेश रायते,प्रमोद रायते,राजु राजोळे,केशव गांगुर्डे,सागर रायते,ऋषीकेश रायते आदींसह शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक गोरख देवढे यांनी प्रास्तविक केले तर सहशिक्षक शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया
विकास रायते, संस्थापक अध्यक्ष जाणता राजा मित्रमंडळ

"समाजातील प्रत्येक तरूणाने वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता "माझा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत" या उपक्रमात सहभागी होऊन शाळेला शक्य ती मदत केल्यास प्रत्येक गावच्या जिल्हा परिषद शाळा नक्कीच समृद्ध होतील."
_______________________________________
न्यूज मसाला चे आवाहन-
घरी रहा-स्वस्थ रहा-साऱ्यांसह आनंदाने
-----------------------------------------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा