सहाय्यक अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
सहाय्यक अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात !
पंचायत समिती बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता आज दि. १७ जून २०२० रोजी लाचलुचपत विभागाच्या यशस्वी सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आला.
शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता ईश्र्वर सखाराम पटेल याने ठेकेदाराचे बील मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. ठेकेदाराने तातुक्यातील टेंभली पेसा अंतर्गत होळगुजरी गृप ग्रामपंचायत येथील मुतारी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा हाळ तसेच त्यानुषंगीत कामांचे सहा लाख त्रेचाळीस हजारांचे काम पूर्ण केले होते त्यातील ५ लाख ४३ हजारांचे बीलाचे फाईलवर सहाय्यक अभियंता ईश्र्वर पटेल याने स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच आज दि. १७ जून २०२० रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात पंच साक्षीदारांसमक्ष स्विकारली असता लाचलुचपत विभागाच्या वतीने रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर कारवाई पो. उप अधीक्षक शिरीष जाधव, पो. निरिक्षक जयपाल अहीरराव, हेकाॅ. उत्तम महाजन, संजय गुमाणे, पो. ना. दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहीरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली व गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा