शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या शेतमालाची पावसाच्या आगमनापूर्वी तत्काळ खरेदी करावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
कापूस, कांदा, मका खरेदी करा - खा.डॉ.भारती पवार
नासिक::-सध्या शेतकरी खूपच अडचणीत सापडला असून कोरोना प्रादुर्भावामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे .शेतात शेतीमाल काढून झाला आहे .शेतकऱ्याकडे साठवणूक सुविधा नसल्याने तो शेतीमाल उघड्यावरच पडला असून त्या मालाची अजून कुठेही खरेदी सुरू नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले आहेत येणाऱ्या काही दिवसात कधीही पावसाचे आगमन होऊ शकते. परंतु अद्यापपावेतो शेतकऱ्यांचा कांदा, मका आणि कापूस हा खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी खरेदी केला जातो परंतु तो फार थोड्या प्रमाणात केला जात असून अनेक शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणावर पडून आहे . सध्या मक्याचे खरेदी करण्याचे हेक्टरी प्रमाण 30 क्विंटल असून ते 50 क्विंटल करण्यात यावे असा शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खा.डॉ.भारती पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सध्या नाफेड मार्फत कांदा खरेदी ही फक्त लासलगाव येथेच होत असुन ती दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दिंडोरी, वणी, कळवण, देवळा, चांदवड, पिंपळगाव बसवंत, मालेगाव, नांदगाव, येवला या सर्व ठिकाणी सुरू करण्याचे काम लवकरात लवकर करावे व कांदा खरेदी करतांना शेतकऱ्यांना रास्त भाव देऊन दिलासा द्यावा .अशा देखील सूचना नाफेडचे व्यवस्थापकांना दिल्या. सदर आढावा बैठकी प्रसंगी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने ,जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी सौ पांडव ,नासिक जिल्हा नाफेड व्यवस्थापक सुशीलकुमार .उपनिबंधक मालेगाव संगमेश्वर बंगाळे ,सहाय्यक निबंधक नांदगाव प्रकाश देवरे ,सहाय्यक निबंधक येवला एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा