प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आमदारांनी व्यक्त केली नाराजी! पिण्याच्या पाण्याचे टँकर फेऱ्या नियमित करण्याच्या सूचना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
कळवण (उमेश सोनवणे यांजकडून)::-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेऊन कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील जाहुले म्हैसमाळ, शिरीषपाडा, देवळा, गळवड, मोरडा, दांडीचापाडा, पळसेत, पळसण, तोरणडोंगरी, बाफळून झुंडीपाडा, गावितपाडा, चिंचपाडा, शिवपाडा व इतर टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश तालुका प्रशासनास दिले. सुरगाणा तालुक्यातील गेल्या चाळीस दशकांपासून कायमस्वरूपी टंचाईग्रस्त असलेल्या गावांमधील नागरिकांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी चर्चा करून आमदार नितीन पवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यात. टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रतिव्यक्ती वीस लिटर पाणी मिळत असल्याने तेथील टँकरच्या अनियमित फे-यांबाबत बाबत तक्रारी जाणून घेत गटविकास अधिकारी यांना नियमित पाणी टँकर पुरवठा करण्याच्या सूचना व तालुका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. सुरगाणा तालुक्यातील महिला, पुरुष, तरुण व तरुणींना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ डोंगरदऱ्यांमध्ये भटकावे लागू नये यासाठी व गावातील विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनास तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा