जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन कामकाज .... सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन कामकाज ....
नाशिक- देशभरातील अकरा प्रमुख राष्ट्रीय कामगार कर्मचारी संघटनांचे निर्णयानुसार, केंद्र सरकार विरोधी, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने नाशिक जिल्ह्यात काळ्या फिती लावून कामकाज करून आंदोलनात सहभागी घेतला.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महासंघाचे राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे आवाहनानुसार विविध प्रश्नांबाबत राज्यात आंदोलन पुकारण्यात आले होते. जिल्ह्यात जिल्हा परीषद कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्यालय, सर्व पंचायत समित्या, व क्षेत्रीय स्थरावरील सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पशु चिकीत्सा व्यवसायी कर्मचारी, अंगणवाडी सुपर वायझर, ग्राम पंचायत कर्मचारी, आशा सेविका,अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेविका, कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ अधिकारी, लिपीक वर्गीय, लेखा विभाग, स्थापत्य अभियंता, शाखा अभियंता, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी ( ग्रामपंचायत, कृषी, समाजकल्याण, शिक्षण), कृषी तांत्रीक अधिकारी, सर्व विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी, अंपंग कर्मचारी, कास्टाईब कर्मचारी कल्यान महासंघ, परीचर, मैल कामगार या कर्मचारी संघटनांनी कार्यालयात, तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी घरीच राहुन काळ्या फिती लावुन आंदोलनात सहभाग घेतला.
कामगार कायद्यांना स्थगिती देण्यात येऊ नये, केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कपात करू नये, कोरोनाच्या नावाखाली केंद्र, राज्य सरकारने खाजगीकरणाला गती देऊ नये, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा, विमा सुविधा, उपलब्ध करून द्यावा, सर्व विभागातील ५५ वर्षावरील तसेच मधुमेह, रक्तदाब,आणि दुर्धर आजाराने ग्रस्त आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधी कामकाज साठी सूट मिळावी, कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा उपलब्ध करून दयावा , रिक्त पदे कायम स्वरूपी भरण्याबाबत सरकारने रोड मॅप तयार करावा आणि या भरतीमध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीला प्राधान्य द्या,
आर्थिक सुधारणां करिता विशेषत: महसूल वाढीसाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेला संयुक्त रित्या तातडीने चर्चेला पाचारण करा, महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय रद्द करा, आदि मागण्या करीता मुख्यमंत्री व मुख्य प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष शोभा खैरनार, विभागीय उपाध्यक्ष कैलास वाकचौरे, जिल्हा अध्यक्ष अरुण आहेर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, मंगला भवार, मधुकर आढाव, काळु पाटील बोरसे , अंबादास वाजे, रविंद्र शेलार , जी .बी . खैरणार , विजय देवरे, रविंद्र आंधळे, उदय लोखंडे, किशोर वारे, रावसाहेब पाटील , सचिन विंचुरकर, सखाराम दुरगुडे, माया घोलप, वैभव पवार व सर्व संलग्न कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी आंदोलन यशस्वी केले .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा