जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! आयोजित कार्यशाळे च्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड !
नाशिक – पाणी हे नैर्सर्गिक संसाधन असून उपलब्ध होणा-या पाण्याचे नियोजन करुन त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश हा गावातील प्रत्येक घरामध्ये नळ जोडणीव्दारे नियमित, सुरक्षित आणि शाश्वत पाणी उपलब्ध करुन देणे हा असून यासाठी लोकसहभागाव्दारे सर्व घटकांचे सक्षमीकरण करुन काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आज जलजीवन मिशनबाबत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना लीना बनसोड यांनी आजही अनेक भागात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने जलजीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे पुर्नभरण, पाणी स्त्रोतांची नियमित देखभाल दुरुस्ती तसेच पाण्याचे अंदाजपत्रक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जलजीवन मिशन मध्ये प्रति माणसी ५५ लिटर पाणी पुरविण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक असून सांडपाण्याचे व्यवस्थापन करुन त्या पाण्याचा परसबागेसाठी किंवा शेतीसाठी वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन करताना पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाणी बचत व पाण्याच्या पुर्नवापराबाबत जनजागृती करण्याच्या सुचना दिल्या. जलजीवन मिशन मध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकाचा लाभ प्रत्येक गावाला होईल यासाठी सर्व यंत्रणांचा सहभाग घेवून काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील विभागीय सल्लागार चंद्रकांत कचरे यांनी जलजीवन अंतर्गत स्वच्छ व सुजल गावाबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन पाणी व स्वच्छतेबाबत गावामंध्ये शाश्वतता कशी ठेवावी याबाबत माहिती दिली. प्रास्ताविकात पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी जलजीवन अभियानाचा उददेश तसेच पाणी व स्वच्छता याविषयी माहिती दिली. यावेळी वरिष्ठ भुवैज्ञानिक जीवन बेडवाल, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार सुरेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उप अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), गटसमन्वयक, समुह समन्वयक, पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा आदि उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा