नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
राज्य शासनाने सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा .
छावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन !
नासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची "सारथी" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, राज्य सरकारने बार्टी च्या धर्तीवर सारथी ही संस्था स्थापन केली होती, या संस्थेला मराठा समाजासाठी आर्थिक व शैक्षणिक उन्नती च्या विविध योजना राबवण्यासाठी कंपनी कायद्यानुसार स्वतंत्र अधिकार देण्यात आले होते तसा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता सारथी या संस्थेला सरकारी निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
संस्थेच्या दैनंदिन कारभार योजनांची अंमलबजावणी या बाबतीत स्वायत्तता अबाधित राहील असेही करारानुसार ठरले होते परंतु ३ डिसेंबर २०१९ ला इतर मागासवर्ग व भटक्या विमुक्त जाती मराठा समाजासाठी च्या सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एसईबीसी कल्याण विभागाच्या वतीने एक परिपत्रक काढत या संस्थेच्या स्वायत्तेला लगाम लावण्यात आला आहे, या परिपत्रकानुसार सरकारच्या परवानगीशिवाय सारथी ला एक रुपया देखील खर्च करण्याचा अधिकार उरलेला नाही सारथी मार्फत जे उपक्रम राबवले जातात शिष्यवृत्ती विद्यावेतन आणि फेलोशिप दिली जाते, त्यांना अधिकाऱ्यांनी ब्रेक लावला असल्याची भावना झाली आहे, या संस्थेचे सर्व उपक्रम योजना सरकारच्या सहमतीशिवाय राबवल्या जाणार नाहीत,असे तीन डिसेंबरच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) या कराराने स्वायत्त संस्था म्हणून सरकारकडे नोंदणीकृत आहे, त्याच धर्तीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव मानव विकास संस्था ( सारथी ) देखील नोंदणीकृत आहे, यानुसार स्वायत्त संस्था पुणे येथे आहे, असे असताना बार्टीला एक नियम व सारथीला दुसरा नियम का ? असा सवाल छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आपणांस करण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सुरू केलेली ही महत्वाकांक्षी योजना सरकारी बाबूच्या कागदोपत्री घोडे नाचवायच्या प्रवृत्तीमुळे जर बंद होणार असेल तर ते कुणीही स्वीकारणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून याबाबत निर्णय घ्यावा ही त्यांना आपल्या द्वारे छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने नम्र विनंती आहे. अन्यथा छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे करेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे, यावेळी करण गायकर - संस्थापक अध्यक्ष, उमेश शिंदे- विद्यार्थी सेना प्रदेश अध्यक्ष, नितीन दातीर -प्रदेश संघटक विदयार्थी सेना, किरण डोके -प्रदेश अध्यक्ष उद्योग आघाडी , विजय खर्जुल-जिल्हा अध्यक्ष, नितीन पाटील - युवक जिल्हा अध्यक्ष , अर्जुन शिरसाठ -जिल्हा कार्याध्यक्ष , सागर पवार -जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना, गणेश दळवी -शहर अध्यक्ष, सागर खर्जुल, रवी भांभिरगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा