बॅंकेच्या कर्ज मर्यादेत ८ लाखावरून १० लाख करण्याचा संचालक मंडळाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय !!! नुतन अध्यक्ष सुनील बच्छाव व उपाध्यक्ष अजित आव्हाड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या
कर्ज मर्यादेत वाढ - सुनिल बच्छाव, अध्यक्ष

नासिक::- नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या नियमित कर्जाची मर्यादा दि.०१ डिसेंबर २०१९ पासुन ८ लाखावरून १० लाख इतकी करण्याचा महत्वपुर्ण कर्मचाऱ्यांना दिलासा देणार निर्णय घेण्यात आला.
नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे नुतन अध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी सांगितले आहे तसेच सभासद झाल्याबरोबर १ वर्षापर्यंत देत असलेला कर्ज मर्यादेत देखील वाढ करून ३ ऐवजी ५ लाख इतकी तर २ वर्ष पुर्ण झालेल्यांना ४ ऐवजी ७ लाख इतकी मर्यादा केली असल्याची माहीती नुतन उपाध्यक्ष अजित आव्हाड यांनी दिली.
संचालक मंडळाची नुकतीच पहिली बैठक अध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ झाली असुन त्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कर्ज मर्यादेत वाढ करण्यात यावी, याबाबत चर्चा करण्यात आली. त्यास सर्व संचालकांनी एकमताने मंजुरी दिली असुन, सदरची
वाढ दि. ०१ डिसेंबर २०१९ पासून लागू होणार आहे, सर्व गरजु सभासदांनी याचा लाभ घ्यावा तसेच जे कर्मचारी बँकेचे सभासद झालेले नाहीत त्यांनी सभासद होवुन बँकेच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ संचालक सर्वश्री भाऊसाहेब खताळे, सुधीर पगार, विजयकुमार हळदे, दिलीम थेटे, बाळासाहेब ठाकरेपाटील, शिरीष भालेराव, दिपक अहिरे, प्रविण भांड, प्रशांत कवडे, सुनिल गिते, प्रशांत गोवर्धने, संदीप पाटील, महेश मुळे, अशोक शिंदे, मंगेश पवार, दिलीप सलाखे, सुभाष पगारे, मंदाकिनी पवार, धनश्री
कापडणीस यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा