२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !!मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक नियुक्त्यांचा ! कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन, अन् हातात नियुक्ती पत्र !! इतिहासात पहिल्यांदाच असे घडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या , कुठे घडले !!!!
२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !!
मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक !!
मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक !!
नासिक::- जिल्हा परिषदेत आज अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ६२ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. सन २०१४ पासुन कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली नव्हती मात्र आज अनुकंपा तत्त्वावर ६२ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
शासननिर्णयानुसार सेवाज्येष्ठता व शैक्षणिक अर्हता यांची सांगड घालत नियुक्ती पत्र देण्यात आली. आजच्या नियुक्त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद करावी अशा ठरल्या. कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करून समुपदेशनाद्वारे रिक्त जागांपैकी उमेदवाराने निवड केलेल्या ठिकाणी तत्काळ नियुक्ती चे पत्र देण्यात आले.
या ऐतिहासिक नेमणुका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रविंद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, गांगुर्डे, राजेंद्र देसले, महेंद्र पवार, रणजित पगारे, आदींच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

******************************************
कामाचा व्याप व रिक्त पदांची मोठी संख्या यामुळे प्रशासनाला विकासकामांसाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती, अनेकांना मुख्यालयी दोन दोन पदभार. काहींना वेगवेगळ्या पंचायत समित्यांमधील पदभार. अनेकांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक. यामुळे कामकाजात दिरंगाई होत होती. आजही अनेक पदे रिक्त आहेत. आजच्या नियुक्त्यांमुळे काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग काहीअंशी निकाली निघाला त्याप्रमाणे प्रशासनाने नवनिर्वाचित राज्य सरकारच्या माध्यमातून उर्वरित पदांच्या भरतीसाठी प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कामांना गती प्राप्त होईल.

"आज नियुक्ती मिळालेल्या सर्वांना शुभेच्छा !"
खालीलप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या !
विस्तार अधिकारी १
वरिष्ठ सहाय्यक. १
परिचर. १८
आरोग्य सेवक. २३
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४
शिक्षण सेवक. ४
अंगणवाडी पर्यवेक्षिका. १
कंत्राटी ग्रामसेवक. ७
पशुधन पर्यवेक्षक. २
_______
एकुण ६२
वरिष्ठ सहाय्यक. १
परिचर. १८
आरोग्य सेवक. २३
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४
शिक्षण सेवक. ४
अंगणवाडी पर्यवेक्षिका. १
कंत्राटी ग्रामसेवक. ७
पशुधन पर्यवेक्षक. २
_______
एकुण ६२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा