ए,व्हि.एम नाईंटी फोर व्हाटस्अॅप गृप लवकरच नोंदणीकृत करणार ! समाजाचे आपण देणे लागतो व त्यासाठीचे कर्तव्य निश्र्चित करून साजरा केला स्नेहमेळावा !! हाथ छूटे भी तो, रिश्ते नहीं छोड़ा करते,. वक़्त की शाख़ से, लम्हे नहीं तोड़ा करते !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

"ए.व्ही.एम. नाईंटी फोर"  चे गेट टुगेदर उत्साहात संपन्न...
निजामपूर : दि.३०::-
"हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते
वक़्त की शाख़ से लम्हे नहीं तोड़ा करते..."
प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या ओळींप्रमाणे जरी जीवनाच्या वाटा बदलल्या तरी मैत्रीचा धागा तुटू न देता आदर्श विद्या मंदिर, निजामपूर-जैताणे शाळेच्या १९९४ साली दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी 'ए.व्ही.एम. 94' या व्हॉटस्अॅप गृपच्या माध्यमातून एकत्र येत आपले गेट टुगेदर उत्साहात साजरा केले
             बालपणापासूनचे वर्गमित्र आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध वाटांनी यश मिळवण्यासाठी निघून गेले पण २५ वर्षांनंतर ते पुन्हा 'रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा' साजरा करण्यासाठी एकत्र आले, या बॅचमध्ये अनेक जण शिक्षक, डॉक्टर्स , इंजिनिअर्स, फार्मासिस्ट, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात मनापासून काम करणारे तरुण नेतृत्व म्हणून समाजात कार्यरत आहेत. समाज, शाळा, विद्यार्थी आणि मित्रांच्या सुखदुःखात धावून जाण्यासाठी 'ए.व्ही.एम. 94' हा व्हॉटस्अॅप गृप स्थापन करून सर्वजण धनाई पुनाई माता मंदिर परिसरात एकत्र जमले, गतकाळातील धमाल आठवणींना उजाळा दिला आणि भविष्यातील समाजाप्रती असलेली कर्तव्येही तेथेच निश्चित केली.
       यात सर्व मित्रांचे पत्ते, फोन नंबर्स,  ब्लड गृप घेण्यात आले. भविष्यात 'ए.व्ही.एम. 94' ही संस्था नोंदणीकृत करून त्यामाध्यमातून मित्र परिवारासाठी तातडीचा वैद्यकीय निधी उभारणे, आपल्या शाळेच्या विकासात सातत्याने भरीव योगदान देणे, विदयार्थी विकासासाठी अनेकविध योजना राबविणे, नवनवीन सामाजिक उपक्रम शोधणे इ. अनेक बाबी निश्चित करण्यात आल्या.
       सदर प्रयोग यशस्वी झाल्यामुळे पुढील वर्षी सहकुटुंब आयोजन करून शिक्षकांचा ही सत्कार करण्याचे ठरविण्यात आले.
      गेट टुगेदरच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद नाशिक येथील सिंचन विभागाचे अभियंता व कोअर कमिटी प्रमुख जितेंद्र पाटील(जेटी), इंजि.विशाल शाह, इंजि. महमद मजहर हुसेन निजामपूरवाला, प्राथमिक शिक्षक वैभव देवरे,  जगदीश भागवत,  विवेक चिंचोले, जाकीर शेख , श्रीमती. वैशाली जगताप, श्रीमती. भावना खैरनार,  श्रीमती. राखी शुक्ल, डॉ.अमोल मोरे, डॉ. जितेंद्र पाटील, ग्रामसेवक वसंतराव पाटील, पिंपळनेर शिवसेना शहरप्रमुख दत्तूभाऊ गुरव, समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, प्रसिद्ध उद्योजक  साहेबराव पाटील, रुपेश वाणी, परेश वाणी, जाहीर शेख , संदीप वाघ, हारूण शेख,  राकेश काकडे व एकूण 70 मित्रांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजनासाठी प्रयत्न केले.
        स्नेहमेळावा सर्वांना आठवण व समाजाप्रती आपली योगदानाची जाणीव सतत देत राहण्यासाठीच्या स्मृतीचिन्हाची रचना व सूत्रसंचालन गजलकार  हेमंत जाधव यांनी केले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !