निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड
निफाड::-नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या निफाड तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी अँड. शेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली निफाड येथील शासकीय विश्राम गृहावर संपन्न झाली. या वेळी निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
      नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या निफाड तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षीक निवडणूक आज बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या वेळी झालेल्या बैठकीचे प्रास्तविक अँड रामनाथ शिंदे यांनी केले.
      नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे, न्यूज मसालाचे संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       पुढील कार्यकारणी खालील प्रमाने - कार्याध्याक्ष- समीरभाई पठाण ,उपध्याक्ष- जगन्नाथ जोशी ,सागर निकाळे ,खजिनदार -चंद्रकांत जगदाळे ,संघटक -योगेश अडसरे ,सहसरचिटनिस - योगेश सगर ,दिपक घायाळ ,सहखजिनदार -आशिफभाई पठाण ,सहसंघटक -दिलीप घायाळ,या बैठकीला अण्णासाहेब बोरगुडे किशोर वडणेरे , हारुणभाई शेख ,रावसाहेब उगले ,किशोर पाटील ,दादाभाई काद्री , नितीन गायकवाड ,दिपक पाटील,शरद जाधव ,निलेश देसाई ,समाधान जाधव ,रामभाऊ आवारे ,गणेश शेवरे , संदिप शिरसाठ ,भाऊसाहेब हुजबंद ,हे उपस्थित होते    .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !