नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्यादुसऱ्यांदा अध्यक्षपदी सुनिल बच्छाव तर उपाध्यक्षपदी अजित आव्हाड यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसालाचे न्यूज वेबपोर्टल लवकरच नवीन आकर्षक रुपात सादर होत आहे !!!

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या
दुसऱ्यांदा अध्यक्षपदी सुनिल बच्छाव तर उपाध्यक्षपदी अजित आव्हाड यांची बिनविरोध निवड !
        नासिक::- नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या समता सभागृहात अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक श्रीमती अर्चना सौंदाणे यांचे अध्यक्षतेखाली बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यांत अध्यक्षपदी सुनिल बच्छाव यांची तर उपाध्यक्षपदी अजित आव्हाड यांची बिनविरोध निवड झाली.
सदरची पदाधिकारी निवडप्रक्रिया अतिशय खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षपदासाठी  सुनिल बच्छाव यांचे नावाची सूचना शिरीष भालेराव यांनी मांडली त्यास प्रशांत कवडे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी अजित आव्हाड यांचे नावाची सूचना दिलीप थेटे यांनी मांडली यास प्रविण भाबड़ यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येक एकच अर्ज आल्याने सुनिल बच्छाव यांची बिनविरोध निवडीची घोषणा श्रीमती अर्चना सौंदाणे यांनी केली. नुतन अध्यक्ष सुनिल बच्छाव यांचा सत्कार मार्गदर्शक रमेश राख, महेश आव्हाड, विजयकुमार हळदे यांनी, व उपाध्यक्ष अजित आव्हाड यांचा सत्कार भाउसाहेब खातळे, उत्तमराव देशमाने, प्रविण भाबड यांनी केला. अध्यक्ष पदासाठी सुनिल बच्छाव यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली तर उपाध्यक्षपदी युवा संचालक अजित आव्हाड यांना प्रथमच संधी मिळाली. यावेळी मावळते अध्यक्ष विजयकुमार हळदे व उपाध्यक्ष प्रविण भावड यांचा उत्कृष्ठ कामकाज केल्यामुळे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब खातळे, सुधिर पगार, दिलीप थेटे
यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
       याप्रसंगी ज्येष्ठ माजी संचालक एन.डी.(नाना) सानप, अशोक गुळेचा, बॅकेचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, मावळते अध्यक्ष विजयकुमार हळदें, दिलीप थेटे, बाळासाहेब ठाकरेपाटील, शिरीष भालेराव, दिपक अहिरे, मावळते उपाध्यक्ष प्रविण भाबड, प्रशांत कवडे, सुनिल गिते, प्रशांत गोवर्धने, संदीप पाटील, महेश मुळे, अशोक शिंदे, मंगेश पवार, दिलीप सलादे, सुभाष पगारे, मंदाकिनी पवार, धनश्री कापडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर, व्यवस्थापक अण्णासाहेब बडाख व कर्मचारी अधिकारी यांनी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जी.पी, खैरणार, विक्रम पिंगळे, इंजि. दत्तात्रय काळे, पी.एस. पाटील, जयप्रकाश मुथा, दिनेश यावलकर, धीरज सोनवणे, नाना बच्छाव जयवंत जाधव, विलास शिंदे, संदिप दराडे, जगन गायकवाड, अमित आडके, दत्तात्रय मदने, भागचंद सांगळे, माधव खोजे, शरद तेजाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र भागवत, प्रथमेश गायकवाड, अशोक गाढे, प्रविण कांबळे, प्रतिक सोनवणे, मंगेश दराडे, हिरामण गांगुर्डे आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !