नाशिक तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर गोडसे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नाशिक तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर गोडसे यांची बिनविरोध निवड !
नाशिक::- जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची २०२०-२२ द्वैवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.  यात सुधाकर गोडसे यांची लागोपाठ चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली.
परिषदेच्या नियमावलीनुसार काल निवडणूक निर्णय अधिकारी मोतीराम पिंगळे यांचे उपस्थितीत नाशिक येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी तालुका अध्यक्षपदी सुधाकर गोडसे, उपाध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे, अरुण तुपे, कार्याध्यक्ष सुनील पवार, सरचिटणीस अरुण बिडवे, खजिनदार हरिश बोराडे, संघटक प्रकाश उखाडे व दीपक कणसे, सहचिटणीस गोकुळ लोखंडे, संतोष भावसार, सहखजिनदार नंदू शेळके यांची निवड झाली. याप्रसंगी मंगलसिंग राणे, पंकज पाटील, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, संजय निकम, वसंत कहांडळ, संजय कवडे, पुरुषोत्तम वानखेडे, रमेश लोखंडे, विलास साळवे, प्रविण आडके आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा पिंगळे यांचे हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकार्‍यांचे परिषद उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष आण्णा बुरगुडे, कल्याणराव आवटे, न्यूज मसालाचे संपादक तथा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील, माजी मंत्री बबनराव घोलप, खा. हेमंत गोडसे, आ. राहुल ढिकले,आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. सरोज अहिरे, विजय करंजकर, रत्नाकर चुंबळे, सचिन ठाकरे, बाबुराव मोजाड, दिनकरराव आढाव, भगवान कटारिया, प्रेरणा बलकवडे, विष्णूपंत म्हैसधूने, तानाजी करंजकर, आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !